प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेला लाभ घ्यावा : सभापती टेंभरे

0
10

योजना व विकास कामाचा आढावा
गोंदिया : पारंपारिक कारागीर आणि शिल्पकारांना संजीवनी देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून १८ प्रकारच्या पारंपरिक व्यवसाय करणार्‍या कारागीरांना होणार आहे. यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करावे, असे सुचना जि.प.चे बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी दिल्यात.
ग्राम पंचायत फत्तेपूर येथे २४ जानेवारी रोजी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना व विकासकामांचा आढावा सभापती टेंभरे यांनी घेतला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी सरपंच वनिता बघेले , उपसरपंच धनंजय रिनाईत, ग्राम पंचायत सदस्य स्वाती पारधी, सुनिता राऊत, धनराज ठाकरे, पारधी, पेशने, तुरकर, गिर्‍हपुंजे, घरकुल अभियंता, मनरेगा अभियंता, कृषी सहाय्यक, आशा सेविका व गावकरी नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी जि.प.सभापती टेंभरे यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना व विकास कामाचा आढावा घेतला. दरम्यान प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने मध्ये १८ पारंपारिक व्यवसायांशी संबंधित कारागिरांना देण्यात येणारे लाभ, कर्ज सुविधा आदिंची माहिती दिली. तसेच परिसरातील विकासकामांचा आढावा घेतला. सुतार, बोट बनवणारे, शस्त्रे बनवणारे, लोहार, हातोडा आणि साधन किट बनवणारे, कुलूप तयार करणारे, सोनार, कुंभार, शिल्पकार (शिल्पकार, दगडी कोरीव काम करणारे), दगड तोडणारे, मोची/जूता कारागीर, गवंडी, टोपली/चटई/झाडू निर्माते विणकर, बाहुली आणि खेळणी बनवणारे (पारंपारिक), न्हावी, हार बनवणारे, धोबी, शिंपी आणि मासेमारी जाळे बनवणारे ( ढिवर ) यांचा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत समावेश करण्यात आला असून लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती संजय टेंभरे यांनी केले आहे.
००००००००००