गोंदिया, तिरोडा, गोरेगाव व अर्जुनी मोरगाव या चार तालुक्यात राबविली जाणार मोहीम – प्रजीत नायर, जिल्हाधिकारी
गोंदिया,दि.7 फेब्रुवारी – हत्तीरोग दुरीकरणासाठी सामुदायिक औषधोपचार मोहिमेची जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.आरोग्य विभागामार्फत सामुदायिक औषधोपचार मोहीम गोंदिया ,तिरोडा ,गोरेगाव व अर्जुनी मोरगाव या चारही तालुक्यात राबवली जाणार असून लोकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसमोर गोळ्याचे सेवन करावे कारण गोळ्यां खाल्यामुळेच हत्तीरोगाचे प्रतिबंध होऊ शकते असे आवाहन याप्रसंगी जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील चार ही तालुक्यात हत्तीरोग दुरीकरणासाठी राबविली जाणारी सामुदायिक औषधोपचार मोहिम बाबतचे सादरीकरण जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी केले.महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे गोंदिया जिल्हयात राष्ट्रीय किटकजन्य नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत समाजातील हत्तीरोग जंतुभार कमी करणे व हत्तीरोगाचा प्रसार थांबविण्याचे उद्दीष्ट समोर ठेऊन जिल्हयातील जनतेला डि.ई.सी. व अल्बेंडाझोल गोळया प्रत्यक्ष खाऊ घालण्याचा कार्यक्रम जिल्हयातील गोंदिया, तिरोडा, गोरेगांव व अर्जुनी मोरगाव या चार तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राबविण्यात येणार आहे.
गोळ्या या सुरक्षित असून लोकांनी कुठलाही गैरसमज किंवा संकोच न बाळगता गोळ्या खाण्याचे आवाहन या वेळी केले. डॉ.चव्हाण यांनी आरोग्य विभागामार्फत कार्यालय, शाळा, अंगणवाडीमध्ये बुथ चे नियोजन करण्यात आले असून त्यानंतर आरोग्य कर्मचारी गृह भेटीच्या माध्यमातून लोकांना प्रत्यक्ष गोळ्या खाऊ घालणार असल्याचे या वेळी सांगितले.
सामुदायिक औषधोपचार मोहिमेत ग्रामीण भागातील 750166 तर शहरी भागातील 213444 असे एकुण 963610 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष गोळया खाऊ घालण्याचे उद्दीष्ट आहे.या करिता एकुण गोळया खाऊ घालणारे कर्मचारी 3854 व 325 पर्यवेक्षक यांची नेमणुक़ करण्यात आली आहे. सदर मोहिमे करिता २४,०९,०२५ डी.ई.सी. व ८,९६,१५० अल्बेंडाझोल गोळ्यांची आवश्यकता आहे. सदर गोळया आरोग्य कर्मचाऱ्या समक्ष जेवण झाल्यानंतर खाणे आहे.तरी जिल्हयातील सर्व जनतेला जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांचे तर्फे आवाहन करण्यात येते की आपल्या घरी गोळ्या खावु घालण्याकरीता आलेल्या आरोग्य कर्मचार्या समक्ष गोळयांचे सेवन करावे.मोहिमेत दोन वर्षाखालील बालके, गर्भवती महिला व गंभीर आजारी रूग्णांनी गोळ्या खावु नयेत. गोळया जेवण झाल्यावरच सेवन करावे. हत्तीरोगाला पळवून लावण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवावे. सर्व विद्यार्थ्यांना शाळेत जेवण झाल्यावर नोडल शिक्षकांच्या निरिक्षणात गोळ्या खावु घालण्यात यावे.
जिल्हास्तरीय समिती सभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमरीश मोहबे,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितिन कापसे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. रोषन राऊत ,शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी संजय गणविर ,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.भारती जयस्वाल,जिल्हा आय.ई.सी अधिकारी प्रशांत खरात,तसेच डॉ.सुबोध थोटे, डॉ.विजय राऊत, डॉ.वेदप्रकाश चौरागडे ई.तालुका आरोग्य अधिकारी , शिक्षण विभाग हिवताप विभागासोबत अशासकिय संस्थेचे अधिकारी उपस्थित होते.
एकदा हत्तीरोग बळावल्यावर उपाय नाही तेव्हा हत्तीरोग होऊ नये, म्हणून डी.ई.सी.व अल्बेंडाझॉल गोळ्यांची फक्त एक मात्रा वर्षातून एकदा सलग पाच वर्षे घेतल्यास हत्तीरोग होत नाही. त्यामुळे हत्तीरोगाचा प्रसार होणे थांबतो. पर्यायाने आपण स्वतः व भावी पिढी हत्तीरोगापासून मुक्त करु शकतो.एक दिवशीय उपचार मोहिम यशस्वी करण्याच्या दृष्टीने व समाजात नविन रोगी होऊ नये याबाबत नागरीकांनी सहभाग द्यावा व गोळयांची एक मात्रा सेवन करावी
– प्रजीत नायर, जिल्हाधिकारी