पिंडदानासाठी घाटावर गेलेल्या भाच्याचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू

0
8

गोंदिया,दि.07-आत्याच्या पिंडदानासाठी रजेगाव घाटावर गेलेल्या भाच्याचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता रजेगावच्या बाघनदी घाटावर घडली.भूपेंद्र भरत बागडे (२०) रा खमारी ता. गोंदिया असे मृत तरूणाचे नाव आहे.

खमारी येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने ३० जानेवारी गावातीलच मंजू लक्ष्मीनारायण गायधने यांचा मृत्यू झाला होता. मंजू ह्या मृतक भुपेंद्रच्या आत्या असल्याने त्यांच्या पिंडदानासाठी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता घरून वाहनाने निघाले होते. पिंडदान करण्यासाठी गेलेले काही लोक आंघोळ करण्यासाठी बाघनदीच्या पाण्यात उतरले. तर भूपेंद्र हा दगडावर बसून होता. परंतु दगडावर उभा होताच त्याचा पाय घसरल्याने त्याचे संतुलन ढासळले. यात डोहात बुडून त्याचा मृत्यू झाला. परिसरातील ढिवरांच्या व आपत्ती व्यवस्थापन विभाग पथकाच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे.