सीईओ मुरुगनंथमचा दरारा,सुरु झाली जि.प.परिसरात स्वच्छतेची मोहीम

0
19

गोंदिया, दि.23 : स्वच्छ, आरोग्यपूर्ण आणि नवीन भारताच्या निर्मितीसह कचरामुक्त भारत करण्याचा संकल्प स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविले जाते.मात्र गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये आत शिरल्यावर ठिकठिकाणी साचलेली घाण तसेच इमारतीच्या बाहेरील अस्वच्छ परिसर बघितल्यास या जिल्हा परिषदेतील स्वच्छतेवर होणारा खर्च कुणाच्या खिशात जातो असा प्रश्न साहजिकच कुणालाही पडला असेल.त्यातच मुख्य म्हणजे स्वच्छ भारत मिशन व संपुर्ण स्वच्छता अभियान राबवणारे कार्यालयही याच परिसरात असल्यावरही त्या विभागप्रमुखाची याकडे असलेले डोळेझाक सरळसेवेने आलेल्या आयएएस अधिकार्यामुळे उघडली गेली हे मात्र निश्चित.मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील स्वभावाने शांत असल्यामुळे त्यांचा धाक कुठल्याच विभागप्रमुखावर काय तर कर्मचारीवर्गावरही नव्हता.त्यांच्या कार्यकाळात तर त्यांच्या कक्षाशेजारील स्वच्छतागृहाची अवस्थाही बघण्यासारखी होती.मात्र नवा जोश आणि उत्साही सरळसेवेने आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगनंथम यांनी पदभार स्विकारल्यानंतर मात्र जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागालाच नव्हे तर सामान्य प्रशासन विभागालाही जाग आल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.नव्या सीईओंच्या धाकाने इमारतीच्या आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता मोहीम जी अनेक महिन्यापासून रखडून होती सुरु झाली आहे.सीईओ एम. मुरुगनंथम यांनी अद्यापही पाहिजे तसा इमारतीचा फेरफटका अद्यापही मारलेला नाही.सध्या ते विभागनिहाय आढावा बैठक घेऊन समजून घेण्याचाच प्रयत्नात आहेत,खरंच ज्या दिवशी ते फिरायला निघाले तर काय होणार त्यांचा हा दरारा कायम राहणार की काही दिवसातच थंड पडणार याकडेही लक्ष लागूण राहणार आहे.त्यातच उद्या शनिवार 24 फेब्रुवारीला जिल्हा परिषद परिसरातील स्वच्छता मोहीम राबवण्याकरीता सर्व कर्मचारी अधिकारी यांना उपस्थित राहण्याच्या सुचना असल्याचे वृत्त आहे.त्यापैकी अपडाऊन कर्मचारी खरंच उपस्थित राहणार काय हे बघावयास मिळणार असून ही मोहीम सातत्य टिकवून ठेवते की अल्पावधीतच बंंद पडते हे येणारा काळ सांगणार यात शंका नाही.