खेलो इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेत प्रणव कोरडेच्या कामगिरीने KLEF विद्यापीठ उपांत्य फेरीत

0
12

छत्रपती संभाजीनगर,दि.23– आसाम राज्यातील गुवाहाटी येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023 – लॉन टेनिस स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगरचा खेळाडू प्रणव कोरडेनी चमकदार कामगिरी करीत आपल्या संघाला उपांत्या फेरीत पोचविले.

गुवाहाटी येथे होत असलेल्या पुरुष-राऊंड रॉबिन स्पर्धेमध्ये पुरुष गट ब मध्ये सहभागी  म्हणजे कोनेरू लक्ष्मय्या एज्युकेशन फाऊंडेशनचे विद्यापीठ विजयवाडा,गुजरात विद्यापीठ,महात्मा गांधी काशी विद्यापीठ तसेच कुरुक्षेत्र विद्यापीठ या गटामध्ये आहेत.
खेलो इंडिया स्पर्धेमध्ये KLEF विद्यापीठ विजयवाडा प्रतिस्पर्धी कुरुक्षेत्र विद्यापीठावर 2-1 मात करून उपांत्यपूर्व सामन्यात प्रवेश केला.आज 23 फेब्रुवारी रोजी त्यांनी गुजरात विद्यापीठ विद्यापीठावर 3-0 विजय संपादन करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.24 फेब्रुवारी रोजी उपांत्य फेरीचा सामना महात्मा गांधी काशी विद्यापीठबरोबर होणार असून छत्रपती संभाजीनगरचा खेळाडू प्रणव कोरडे हा KLEF विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत आहे.एक सामना जिंकल्यानंतर सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळणार अशाप्रकारे मेडलच्या दिशेने वाटचाल चालू आहे.