गोंदिया,दि.28-गोंदिया जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगनाथन पी. यांचा जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांनी पुस्तक भेट देऊन सत्कार केला.
यावेळी त्यांच्याशी हितगुज साधुन गोंदिया जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेला अतिदुर्गम आदिवासी नक्षलग्रस्त जाते म्हणून ओळखला जातो.नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला हा जिल्हा,या जिल्ह्याचा मानव निर्देशांक सुद्धा अत्यल्प आहे.त्यामुळे जिल्ह्यात बऱ्याच समस्या आहेत.
त्याचप्रमाणे आरोग्य, शिक्षण व क्रीडा या विषयावर चर्चा करण्यात आली.अतिदुर्गम भागात तसेच शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य व शिक्षणाच्या सोयी सुविधा पुरवुन त्यांचा विकास कसा करता येईल.दोन्ही विभागात असलेल्या समस्या कश्या सोडवता येतील व त्यावर उपाययोजना अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सशेंन्द्र भगत,निशा तोडासे,अंजली अटरे,विमलताई कटरे,तुमेश्वरी बघेले, शिक्षणाधिकारी डॉ महेंद्र गजभिये, कार्यकारी अभियंता जिवनेस मिश्रा, क्रीडा अधिकारी अनिराम मरसकोल्हे उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगनाथन पी.यांचा सत्कार
वाढदिवसाच्या शुभेच्छा