जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन व जलपूजन

0
9

गोंदिया, दि.16 : गोंदिया पाटबंधारे विभागामार्फत बोदलकसा मध्यम प्रकल्प ता. तिरोडा येथे आज अधीक्षक अभियंता आर.जी. पराते यांच्या प्रमुख उपस्थितीत जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन व जलपूजन करण्यात आले.

        सदर कार्यक्रमाप्रसंगी कार्यकारी अभियंता सोनाली सोनुले, अमृतराज पाटील कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभाग गोंदिया प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच एस.पी. सहारे, व्ही.व्ही. निकम, एम.टी. पटले, पारधी, हिंगे, मडकाम तसेच पाटबंधारे विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांनी जलप्रतिज्ञा घेऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 16 मार्च 2024 ते 22 मार्च 2024 पर्यंत गोंदिया जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली सोनुले यांनी केले आहे.