रेती तस्करीप्रकरणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार यांना अटक

0
7

गडचिरोली,दि.२३: शहरानजीकच्या कठाणी नदीतील रेतीघाटावरुन अवैधरित्या रेती वाहतूक केल्याच्या आरोपाखाली शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व रेतीघाटाचे कंत्राटदार अरविंद कात्रटवार यांना पोलिसांनी आज अटक केली.
२ जून रोजी कठाणी नदीतील रेतीघाटातून अवैधरित्या रेतीचे उत्खनन करुन वाहतूक केल्याप्रकरणी उपविभागीय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या नेतृत्वातील महसूल कर्मचाऱ्यांच्या पथकाने ९ ट्रॅक्टर पकडले होते. याप्रकरणी २४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात रेती घाटाचे कंत्राटदार अरविंद कात्रटवार यांचाही समावेश होता. आतापर्यंत पोलिसांनी २३ जणांना अटक केली होती. आज सकाळी अरविंद कात्रटवार यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. अन्य २३ जणांना जामीनावर सुटका करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.