आयटक तर्फे जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिना निमित्त सभा

0
5

गोंदिया-ऑल इंडिया ट्रेड युनियन कांग्रेस (आयटक ) तर्फे 1मे जागतिक कामगार दीन व महाराष्ट्र दिना निमित्त कामगार भवन रामनगर गोंदिया येथे आयटकचे जिल्हाध्यक्ष कॉ. हौसलाल रहांगडाले यांचे अध्यक्षते खालीसभा घेण्यात आली. या सभेचे प्रास्ताविक आयटक जिल्हा सचिव कॉ. रामचंद्र पाटील यांनी केले.सभेला प्रामुख्याने आयटक राज्य सचिव कॉ. मिलिंद गणवीर, जिल्हा सहसचिव कॉ. करुणा गणवीर, कल्पना डोंगरे, शेतमजूर संघटनेचे जिल्हा सचिव कॉ. प्रल्हाद उके, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष विठाताई पवार यांनी मे दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. सभेच्या सुरुवातीला 1 मे 1886 ला अमेरिकेचे शिकागो शहरातील कामाचे 8 तास निश्चित करण्यासाठी झालेल्या कामगार चळवडीच्या व संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या चळवडिच्या हुतात्म्याना श्रद्धांजली वाहून सलामी देण्यात आली. त्यानंतर प्रमुख वक्त्त्यांनी आपल्या भाषणात कामगार चळवळीचा इतिहास मांडला व कामगार लढ्याची विविध उदाहरणे देऊन माहिती विषद केली. वक्त्यांनी सांगितलेकी वर्तमान सरकार नें कामगार वर्ग समोर मोठे संकट निर्माण केले आहे. 40 कामगार कायद्याचे रूपांतर 4 श्रम संहितेत करून कामगार चळवड व कामगार वर्गाचे हक्क हिरावून घेतले आहेत. सार्वजनिक उद्योगाचे झापाट्याने खासगीकरण केले आहेत, नोकर भर्ती बंदी, बाह्य्यंत्रेने भर्ती करने वेतन न देता मानधन देने, कंत्राटीकरण करने, धनिकधार्जीने धोरणे राबवत असून अश्या सरकारला हद्दपार करण्याची गरज असुन सत्ता परिवर्तनचा लढा कामगार वर्ग करीत आहे.याकरिता महाराष्ट्रात व देशात आयटक मोठमोठ्या मोहिमा करत आहे. सभेत प्रामुख्याने सर्व कॉ. विवेक काकडे, विजय चौधरी, सुरेश रंगारी, जीवनकला वैद्य, अशोक ठवकर, श्रीराम फुंडे,जितेंद्र गजभिये,सह आशा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, विद्युत कर्मचारी, शेतमजूर,शापोआ कर्मचारी हजर होते.