हिरडामालीच्या विद्यार्थांनी साधला व्हीसीद्वारे शिक्षणमंत्र्याशी संवाद

0
13

गोंदिया,दि.27- राज्यातील आज जिल्हा परिषद शाळांचा नव्या शैक्षणिक सत्राचा पहिला दिवस होता.गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक अशा १०४९ शाळा ही आजपासून(दि.27) सुरू झाल्या. यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी राज्यातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या,पालकांच्या आणि शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या.यात गोंदिया जिल्ह्याच्याही समावेश होता.गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील हिरडामाली जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थांची निवड करण्यात आली होती. व्हिडीओ काॅन्फरंसच्या माध्यमातून प्रथमच शाळेतील विद्यार्थांनी थेट शिक्षण मंत्र्यांशी संवाद साधण्याची पहिलीच वेळ होती.gondia-1-2-293x165
आदिवासी व नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील हिरडामाली येथील जिल्हा परिषद शाळा ही संपूर्ण डिजिटल शाळा आहे. त्यामुळे आज झालेल्या कार्यक्रमासाठी या शाळेची निवड करण्यात आली. शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हीडीओ काॅन्फरंस सभागृहात विद्यार्थी ,पालक आणि शिक्षकांशी थेट व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधून शाळेत राबविण्यात येणाऱ्या डिजिटल शाळा, ज्ञानरचनावाद अश्या विविध शैक्षणिक उपक्रमाविषयी माहिती जाणून घेतली.यावेळी जिल्हाधिकारी डाॅ.विजय सूर्यवंशी,मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.चंद्रकांत पुलकुंडवार, अति.मुकाअ जयंवत पाळवी,शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.विशेष म्हणजे शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा आहे,अधिकारी वर्ग आपण बाजुला व्हा आणि त्यांना समोर करा असे म्हटल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्यासह सर्वच अधिकारी हे मागच्या रांगेत आले आणि विद्यार्थी पहिल्या रांगेत येऊन सवांद साधू लागले.दरम्यान गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांनीही गोंडी भाषेत शिक्षणमंत्र्यांशी संवाद साधला.