2 जुर्ले ला ओबीसी कृती समितीच बैठक नागपूरात

0
9

नागपूर,दि.30-विदर्भातील सर्व ओबीसी संघटना मिळून येत्या ७ ऑगस्ट २०१६ रोज रविवारला डॉ.पंजाबराव देशमुख सभागृह,धनवटे नॅशनल काँलेज येथे एक दिवसीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.या अधिवेशनाच्या तयारीसंदर्भात २ जुर्ले रोज शनिवारला दुपारी २ वाजता धनवटे नॅशनल काँलेज नागपूरच्या सभागृहात बैठकिचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकित ओबीसी अधिवेशन समिती,समन्वय समिती,प्रचारप्रसिध्दी समिती,अर्थविषयक समिती,भोजन समिती,वक्ता व संचालन समिती,साहित्य निर्मिती समिती,मान्यवर व्यवस्थापन समिती,स्मरणिका प्रकाशन समितीचा विस्तार करण्यासोबतच नागपूर येथे 18 जुले पुर्वी आंदोलन करता येईल काय यावर चर्चा करण्यात येणार आहे.तरी सर्व ओबीसी संघटनाच्या प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते,समाजसंघटनेचे पदाधिकारी यांना उपस्थित राहण्याचे आवाहन ओबीसी कृती समितीच्यावतीने सचिन राजुरकर,शरद वानखेडे,खेमेंद्र कटरे,गोपाल सेलोकर,शेषराव येलेकर,पांडुरंग काकडे,भुषण दडवे,बबनराव फंड,मनोज चव्हाण,विजय तपाडकर,सुषमा भड, गुणेश्वर आरीकर,विनोद उल्लीपवार,प्रा.एन.जी.राऊत,शुभांगी घाटोळे,गोविंद वरवाडे,श्रावण फरकाडे आदीनी केले आहे.