अर्जुनी मोर.-अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत समाविष्ट इंजोरी हे गाव या गावांमध्ये पंचवीस हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी प्रादेशिक योजनेअंतर्गत तयार झालेली आहे सदर प्रादेशिक योजनेअंतर्गत इंजोरी या गावाला पाणीपुरवठा करताना जलवाहिन्यांमध्ये योग्य दाब तयार न झाल्यामुळे इंजोरी या गावातील पाणी टाकीमध्ये पाणीपुरवठा होत नाही मागील दोन वर्षांपासून सुजल बहुउद्देशीय सामाजिक सेवा समितीचे पदाधिकारी व कर्मचारी प्रयत्न करत असून अजून पर्यंत इंजोरी या गावातील पाणी टाकीमध्ये नियमित पाणीपुरवठा करू शकले नाही. त्यामुळे इंजोरी या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई असून गावातील लोकांना पिण्याकरिता पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सुजल बहुउद्देशीय सेवा समितीचे सचिव कालिदास पुस्तोडे व सदस्य चुनीलाल येरणे यांनी आज जिल्हा परिषदेचे गटनेते लायकरामजी भेंडारकर यांना निवेदन देऊन इंजोरी साठी पिण्याकरिता स्वतंत्र पाण्याचे स्त्रोत तयार करून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना निर्माण करावी याकरिता जिल्हा परिषदेच्या नियोजन कमिटी मधून पैशाची निधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली.