तालुका स्तरावर दि.15 ऑगस्ट रोजी 75 कर्मचार्याना गौरविणार
3 डॉक्टरांना दहा हजाराच्यावर कुटुंब कल्याण शस्त्रक्रीया केल्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार देवुन केले सन्मानित
गोंदिया,दि.१२-जिल्हा स्तरावरील जिल्हा परिषद सभागृहातील वसंतराव नाईक सभागृहात आरोग्य विभाग व के.टी.एस. रुग्णालय यांच्या एकत्रित सहकार्याने जागतिक लोकसंख्या दिनाच्या औचित साधुन राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणारे आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी,वैद्यकीय अधिक्षक, अधिपरिचारिका,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका,आशा सेविका,स्टाफ नर्स असे एकुण 110 अधिकारी व कर्मचाऱ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच 3 सर्जन डॉक्टरांना त्यांनी त्यांच्या कालकिर्दीत दहा हजाराच्यावर कुटुंब कल्याण स्त्री/पुरुष नसबंदी शस्त्रक्रीया केल्याबद्दल जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत जीवन गौरव पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.
सदर पुरस्कार वितरण सोहळाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम,विशेष अतिथी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती योपेंद्रसिंग टेंभरे व प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य समितीचे सदस्य छायाताई नागपुरे व प्रविणजी पटले, जिल्हा परिषद सदस्य नंदेश्वर यांचे सह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिष मोहबे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरजंन अग्रवाल,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे यांच्या उपस्थीतीत संपन्न झाला.
सर्वात प्रथम जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने क्रांतिकारी बिरसा मुंडा व आरोग्याची देवता माता धन्वतरी माता या दोघांना माल्यार्पण करुन वंदन करण्यात आले.
भारताने लोकसंख्येत चीनला मागे टाकले आहे.आता भारत जगात लोकसंख्येबाबत प्रथम क्रमांकावर पोहचला आहे.18 व्या शतकात भारताची लोकसंख्या 12 कोटी होती. ती आता 142 कोटी झाली आहे. भारतील लोकसंख्येचा प्रवास वेगाने वाढला आहे.पण या समस्यांचा विचार करून त्या हाताबाहेर जाण्याआधी वेळीच कशा रोखता येतील याचा विचार होणे आणि त्याबाबत ठोस पावले उचलणे ही काळाची ज्वलंत गरज ठरेल. यामध्ये लोकसंख्येच्या वाढीला आळा घालणे,राष्ट्रीय साधनसंपत्तीचे योग्य नियोजन,काही अत्यावश्यक नवे प्रकल्प उभारणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दूरदृष्टीने कायदे पालनाची स्वयंशिस्त जनतेमध्ये निर्माण होणे या गोष्टी गरजेचे असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांनी यावेळी म्ह्टले आहे.
लोकसंख्येचे नियोजन बाबत भारताच्या बाबतीत बोलायचे झाले तर 1952 मध्येच वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी आणि अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी कुटुंब नियोजनाला राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून जाहीर करण्यात आले. तसेच लग्नाचे वय 18 वर्षे केल्याचे हा सुद्धा त्याचा भाग आहे.बालमृत्यूचे प्रमाण रोखणे यासाठी सर्वांना योग्य लसीकरण,उत्तम वैद्यकीय उपचार,कुपोषण,साथीचे आजार अशा टाळता येण्याजोग्या बालमृत्यूच्या कारणांचे निवारण केल्यास जन्मदर कमी करता येईल.कुटुंब नियोजनाची साधने यात कंडोम,तांबी,गर्भनिरोधक गोळ्या ही साधने,कायदेशीर गर्भपाताच्या सोयी या कानाकोप-यात गावपातळीवर जनजागृती करण्यात यावे. राष्ट्रीय कार्यक्रमात जन्मानंतर तांबी बसविणे,लाभार्थिच्या ईच्छेनुसार एका अपत्यानुसार पाहिजे तेवढे अंतर ठेवण्यासाठी कॉपर-टी व गर्भनिरोधक गोळ्या,अंतरा ईंजेक्शन लावण्याबाबत लाभार्थ्यांना प्रवृत्त करणे,कायम स्वरुपी कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करून घेणे ई. विविध पर्याय उपलब्ध करुन घेणे आवश्यक असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी प्रास्तविक मध्ये सांगितले.
जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती योपेंद्रसिंग टेंभरे व जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य समितीचे सदस्य छायाताई नागपुरे यांनी भारतातील लोकसंख्येचे आरोग्य सुधारण्यासाठी नागरिकांच्या हक्कांबद्दल जागरुकता वाढवणे अपेक्षित आहे.समुदायाच्या सहभागाला आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देऊन एक व्यापक दृष्टीकोन विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे सांगुन जिल्हा आरोग्य प्रशासनाने अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानित केल्याने त्यांच्या मध्ये काम करताना नवी उर्जा निर्माण होणार असल्याचे सांगितले.
जीवन गौरव पुरस्कार – प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अभय पाटील, ग्रामीण रुग्णालय गोरेगावचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.पुरुषोत्तम पटले व ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनीचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.दीपक धूमनखेडे यां तिघांनी त्यांच्या प्रदिर्घ सेवेच्या कालकिर्दीत दहा हजाराच्यावर कुटुंब कल्याण स्त्री/पुरुष नसबंदी शस्त्रक्रीया केल्याबद्दल जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत त्यांच्या कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार देवुन सन्मानचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात आले.
जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित-
बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. नीतिका पोयाम, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. गगन गुप्ता,डॉ.नंदा गेडाम,डॉ.आनंद गजभिये,डॉ. रत्नमाला रामटेके, डॉ.हर्षा अहिर,डॉ.नलिनी येळे,डॉ.पूजा हुकरे,डॉ.राहुल शेंडे,डॉ.सिद्धांत शहारे,डॉ.कुलदीप बघेले,डॉ.सुधीर राऊत, डॉ.कुणाल नाकाडे, डॉ.कीर्ती चुलपार, डॉ.पिंकू मंडल, डॉ.शुभम लंजे, डॉ.पायल रहांगडाले,डॉ.स्नेहल खोब्रागडे यांचेसह आरोग्य कर्मचारी अनुजा लांजेवार,शितल गोस्वामी,माया बोरकर,एस.आर.राठोड,डि.के.सोनटक्
कार्यक्रमाला आरोग्य विभाग,राष्ट्रीय आरोग्य अभियान,के.टी.एस. शासकीय सामान्य रुग्णालय,बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय ई.कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स,आरोग्य कर्मचारी,कार्यक्रम समन्वयक यांचेसह डॉ.विकास विंचुरकर,डॉ.सुशांकी कापसे,डॉ.मिना वट्टी, डॉ.सुवर्णा उपाध्याय,जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी विजय आखाडे, जिल्हा आय.ई.सी. अधिकारी प्रशांत खरात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.निरजंन अग्रवाल व आभार प्रदर्शन डॉ.मिना वट्टी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीसाठी प्रशांत बन्सोड,मिलिंद नंदागवळी,व्हो.बो.शेंडे,कल्याणी चौधरी,रविंद्र श्रीवास यांनी परिश्रम घेतले.