नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात फुलपाखरु सर्व्हेक्षण

0
26

गोंदिया, दि.13 : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात भारतीय लँडस्क्रेपमध्ये असलेल्या रिझर्वच्या विविध अधिवासामध्ये समृध्द फुलपाखरु प्रजातीचे अन्वेषण आणि दस्ताऐवजीकरण करणे या सर्व्हेक्षणाचे उद्दिष्ट असून 12 ते 15 सप्टेंबर 2024 पर्यंत द्वितीय नागरिक फुलपाखरु सर्व्हेक्षण 2024 चे आयोजन करण्यात आले असून सदर फुलपाखरु सर्व्हेक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी फुलपाखरु प्रेमींना आमंत्रित करण्यात येत आहे.

        त्यानुषंगाने फुलपाखरु प्रेमींकडून 18 ऑगस्ट 2024 पर्यंत आवेदन स्विकारण्यात येतील. यासाठी प्रशासनाच्या सोईकरीता ऑनलाईन रजिष्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. सदर आवेदन फॉर्म ऑनलाईन पध्दतीने रजिष्ट्रेशन करण्याकरीता सोबत QR कोड उपलब्ध करुन देण्यात येत आहे. करीता द्वितीय नागरिक फुलपाखरु सर्व्हेक्षण 2024 चे कार्यक्रमात सहभागी होण्याऱ्या इच्छुक फुलपाखरु प्रेमींनी याबाबत नोंद घ्यावी. विशेष माहितीकरीता www.nawegaonnagzira.com या वेबसाईवर संपर्क साधावा. असे नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोलीचे उपसंचालक पवन जेफ यांनी कळविले आहे.