सडक अर्जुनी,दि.२०- रक्षाबंधन हा महिलांसाठी व पुरुषांसाठी भाऊबहिणीचे नाते वृंदीगत करणारा महत्वाचा उत्सव आहे.याच रक्षाबंधन सणानिमीत्य महायुती सरकारनी लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून तिन हजार रुपये प्रत्येक महीलेच्या खात्यावर टाकुन रक्षाबंधनाची भेट दिली आहे.
या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधुन माजी सामाजीक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे सडक/अर्जुनी येथील जनसंपर्क कार्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रातील शेकडो महिलांनी माजी मंत्री बडोले यांना राख्या बांधल्या. उपस्थीत सर्व महिला भगीणींचे आभार मानतांना माजी मंत्री बडोले यांनी केंद्र व राज्यशासन आपल्या रक्षणाकरीता व हिताकरीता सदैव आपल्या पाठीशी आहे. उमेदच्या माध्यमातून बचतगटाद्वारे महीलांना आर्थीक पाठबळ देवुन त्यांना सक्षम कसे करता येईल याविषयी शासनस्तरावर काम सुरु आहे.शासन महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना सुध्दा राबवीत आहे.त्यातच लाडकी बहीण योजना ही महीला भगीणीसाठी संजीवनी ठरत आहे. रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिलांना पेढे भरवुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी माजी मंत्री राजकुमार बडोले, भाजपा तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, प.स.सदस्य चेतन वळगाये, जयवंत डोये,व अन्य मान्यवर उपस्थित होते.