आगारप्रमुखासह 89 पद गोंदिया आगारात रिक्त

0
6

गोंदिया,दि.07 :महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागातंर्गत जिल्हाचे स्थळ असलेल्या गोंदिया आगारात आगार प्रमुखासंह विविध 89 कर्मचार्‍यांची पदे रिक्त अाहेत. त्यामुळे बसफेर्‍यांच्या शेड्युलमध्ये वारंवार बदल करावे लागत आहे. एसटी महामंडळाने तातडीने रिक्त पदांची पूर्तता केल्यास गोंदिया आगाराच्या उत्पन्नात वाढ होवू शकते.
गोंदिया आगारात वाहकांची एकूण १७२ पदे मंजूर आहेत. मात्र सध्या आगारात १२७ वाहक असून तब्बल ४५ वाहकांची पदे रिक्त आहेत. तर चालकांचीसुद्धा १७२ पदे मंजूर आहेत. मात्र १४५ चालक कार्यरत असून २७ चालकांची पदे रिक्त आहेत. तसेच यांत्रिकांची ५७ पदे मंजूर असून केवळ ४0 यांत्रिक कार्यरत असून १७ यांत्रिकांची पदे रिक्तच आहेत. वाहक, चालक व यांत्रिक मिळून तब्बल ८९ पदे गोंदिया आगारात रिक्त आहेत.
मुख्य यांत्रिकाचे एक पद रिक्त आहे. मात्र इतर यांत्रिक कार्य सांभाळत असल्याने गोंदिया आगाराची बससेवा सुरू आहे. परंतु वाहकांची ४५ पदे व चालकांची २७ पदे रिक्त असल्याने चालक वाहकांच्या संख्येत मोठीच तफावत आहे. त्यामुळे वारंवार शेड्युलमध्ये बदल करावा लागतो. अशात वाहकाला दुसर्‍या शेड्युलमध्ये ओव्हरटाईम करावा लागतो. मात्र वाहकाने ओव्हरटाईमसाठी नकार दिला किंवा एखादा वाहक सुट्टीवर गेला तर तेवढय़ा किलोमीटरचा प्रवास रद्द करावा लागतो.
मानव विकास कार्यक्रमांतर्गत धावणार्‍या बसेसचा शेड्युल फिक्स असल्याचे सांगण्यात आले आहे.काही मार्गावर विद्यार्थिनींच्या पासेस बनविण्यात आल्या नसल्याने व त्या मार्गावर विद्यार्थी संख्या पासअभावी किंवा शाळा बरोबर सुरू झाल्या नसल्याचे फेर्‍या रद्द करण्याची पाळी येते.