आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांचा मोर्चा

0
9

देवरी : शासन निर्णय ८ जून २०१६ च्या ‘काम नाही, वेतन नाही’ या धोरणाच्या विरोधात अनुदानित आदिवासी आश्रमशाळा कर्मचारी संघटना जिल्हा गोंदिया, भंडारा व नागपूरच्या संयुक्त विद्यमानाने नागपूरच्या आदिवासी विकास विभाग अप्पर आयुक्त यांच्या कार्यालयावर नुकतेच धडक मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.

मोर्च्याचे नेतृत्व आ.ना.गो. गाणार, माजी आ. डायगव्हाणे, विदर्भ शिक्षक संस्कृती संघाचे प्रवर्तक व आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचे सचिव विलास सपाटे, आश्रमशाळा कर्मचारी संघाचे अध्यक्ष भोजराज फुंडे आणि कोचे यांनी केले. त्यांच्या नेतृत्वात सदर मोर्चा काढून सांगता संविधान चौकात करण्यात आली. धरणे आंदोलन दरम्यान काम नाही वेतन नाही या शासनाच्या जी.आर.नुसार आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायावर व आर्थिक शोषणावर आपले विचार स्पष्ट केले.

याप्रसंगी मोर्च्याच्या शिष्टमंडळाने अप्पर आयुक्त नागपूरचे प्रतिनिधी सहायक प्रकल्प अधिकारी रानडे यांच्यामार्फत आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव मुंबई यांच्या नावे निवेदन सादर केले.
संचालन जे.पी.खुणे यांनी केले. उपस्थितांचे आभार बी.एस.मडावी यांनी मानले