तेली समाज महिला आघाडी अध्यक्षपदी जया धावडे

0
17

गोंदिया : प्रांत तेली समाज विदर्भ विभागाची सभा प्रांत तेली समाज महासंघाचे अध्यक्ष खा. रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली झाली.अतिथी म्हणून विजय कार्डिले, सुधाकर गायधनी, रमेश गिरडे, ईश्‍वर बाळबुद्धे, अँड. धनराज खोब्रागडे, बाळबुधे, उमेंद्र भेलावे, हरिराम येळणे, सोनाक्षी पडोळे, किशोर हजारे, जया धावडे, हरीश चिंधालोरे उपस्थित होते. या वेळी गोंदिया जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी तिरोडा पं.स. सदस्य जया धावडे यांची निवड करण्यात आली. खा. तडस यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देवून स्वागत करण्यात आले. त्यांनी आपल्या नियुक्तीबद्दल माजी महिला जिल्हाध्यक्ष सुनिता धरमशहारे, यामिनी धुर्वे, दुर्गा खोब्रागडे, पायल भेलावे, ममता येळणे, ज्योती भेलावे, शोभा आगाशे, पौर्णिमा क्षीरसागर, जयश्री धावडे, डी.आर. गिर्‍हेपुंजे, अँड. अशोक मलेवार, कमल कापसे, भरत मलेवार, खोब्रागडे, किशोर मलेवार, हरीश चिंधालोरे, हरिराम येळणे, उमेंद्र भेलावे, गणेश बरडे, राजधर मलेवार, बालाराम साठवणे यांचे आभार मानले.