गोंदिया,दि.२० ः महाराष्ट्र राज्य आगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या वतीने आज २० सप्टेंबरला गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सारस चौकात रास्तारोको आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधण्यात आले.त्यानंतर जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री व महिला बालविकास मंत्री यांना सादर करण्यात आले.मोर्च्याचे नेतृत्व आयटकचे राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहांगडाले,रामचंद्र पाटील,परेश दुरुगकर,राज्य सचिव विठाताई पवार,जिल्हा अध्यक्ष शकुंतला फटींग,सचिव पोणीॅमा चुटे,जिवनकला वैद्य,अनिता शिवनकर यांनी केले.
आंगणवाडी सेविकेच्या मानधनात १० हजार तर मदतनिसांच्या मानधनात ७५०० हजाराने वाढ करण्यात यावे.पेन्शन योजना व ग्रॅज्यटी लागू करण्यात यावे.वैद्यकीय रजा मंजूर करण्यात यावे.उन्हाळ्यात एक महिन्याची छुट्टी देण्यात यावी आदी मागण्यांना घेऊन हा रास्तारोको आंदोलन करण्यात आलेला होता.सदर आंदोलनातील मागण्या मान्य न झाल्यास २३ व २४ सप्टेंबरला मुबंईत मंत्रालयासमोर उपोषण आणि 25 सप्टेंबरला आझाद मैदानावर जेल भरो आंदोलन करण्यात येणार असल्याचा निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे.आंदोलनात प्रणिता रंगारी,लालेश्वरी शरणागत,अजंना ठाकरे, देवागंना बाई, बिरजूला तिडके, सुनिता मंलगाम, पुष्पा भगत, शामकला मसराम, राजलक्ष्मी हरिणखेडे, पुष्पा ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनिस सहभागी झाल्या होत्या.