प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्याकडून मृतांच्या नातेवाईंकाना १२ लाखाची मदत जाहीर
पिपरी येथील लांजेवार व घोटी येथील सय्यद पती पत्नींचा बस अपघातात मृत्यू
गोंदिया,दि.२९ : सडक/अर्जुनी, कोहमारा मार्गे गोंदियाला जात असलेल्या शिवशाही (क्रमांक एम.एच.०९ इ एम १२७३) बसला झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांची संख्या ११ वर गेली आहे. बसमधील 6 महिला व 5 पुरुष असे एकूण 11 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. जखमी झालेल्या प्रवाशांपैकी 18 जखमी प्रवाशांचे उपचार ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा येथे सुरु आहे. तसेच 11 जखमी प्रवाशांचे उपचार के.टी.एस. सामान्य रुग्णालय
गोंदिया येथे सुरु आहे. मृत झालेल्या 11 प्रवाशांपैकी 9 प्रवाशांची ओळख पटलेली आहे. त्यातच मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या घटनेने गोंदिया जिल्हा हादरला असून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाकडून मृतकांच्या कुटुबियांना १० लाख रुपयाची मदत जाहीर केली आहे.सोबतच राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही घटनेबद्दल शोकसंवेदना व्यक्त करीत प्रधानमंत्री राहत कोष मधून मृतकाच्या कुटुबियांना २ लाख रुपयाच्या मदतीची घोषणा केली आहे.
एमएच ०९ ईएम १२७३ क्रमांकाची भंडारा आगाराची शिवशाही बस घेऊन चालक प्रणय रायपूरकर व वाहक नितीन मते हे भंडाऱ्याकडून गोंदियाच्या दिशेने निघाले होते. बसमध्ये ४० प्रवासी प्रवास करीत होते. दरम्यान, सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा-खजरीलगतच्या वृंदावनटोला फाटा वळणावरून भरधाव बस अनियंत्रित होऊन रस्त्यालगत असलेले बस वाहकाच्या बाजूला उलटली. बसचा वेग इतका जास्त होता की कडेला असलेले कठडे व काही खांब उखडून पडले. काही खांब वाकत गेले. लोखंडी कठडे प्रवासांच्या सीटजवळून घासत गेले. घटनेची माहिती होतात परिसरातील नागरिक आणि डुग्गीपार, गोंदिया व गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. शिवशाही बसचा अपघात घडल्यानंतर घटनास्थळावर मोठा जमाव जमला. प्रवाशांच्या आक्रोशानं अनेक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र अपघात घडल्यानंतर शिवशाही बसच्या चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी जखमी प्रवाशांना जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.अपघातानंतर दोन तास वाहतूक बंद होती.जिल्हाधिकारी प्रजीत नायर व पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेच्या चाैकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत. डुग्गीपार पोलिसांनी बससचालक प्रणय रायपूरकर याला ताब्यात घेतले आहे.
गोंदिया भंडारा शिवशाही बसला अपघात सडक अर्जुनी तालुक्यातील खजरीजवळ 29 प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी ते गोंदिया मार्गावर खजरी- डव्वा गावाजवळ शिवशाही बस (क्रमांक एम.एच.०९ इ एम १२७३) उलटून अपघात झाला.या अपघातात मृतकांचा ११ वर गेला आहे. सुमारे 29 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडला.घटनास्थळावर रक्ताचा थारोळा पडल्याचे चित्र सर्वत्र होते.तर बसमधील प्रवासी ज्यांचा मृत्यू झाला,त्यापैकी कुणी बसमधून बाहेर फेकले गेले,तर कुणी बसमध्ये दाबले गेल्याचे भयावय चित्र होते.अपघात घडताच बसमधील इतर जखमी प्रवाशांंचा वाचविण्याकरीताच टाहो एैकताच आजूबाजूच्या शेतात असलेले नागरिक,ग्रामस्थ व राज्य महामार्गाने जाणार्यांनी थांबत बसकडे धाव घेत आपल्या परीने जखमींना बसमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न पोलिसांच्या येण्यापुर्वीच सुरू केले होते.
भंडारा-गोंदिया ही शिवशाही बस दुपारी भंडाऱ्याहून गोंदियाकडे येथे होती. बस चालकाने एका दुचाकीला ओव्हरटेक करताना त्याचे बसवरील नियंत्रण सुटले व ती उलटली. जवळपास २० फूट रस्त्यापासून बाजूला घासत गेली. त्यामुळे बसमधील 8 प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. 29 प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांची संख्या अधिक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मृतदेह गोंदिया येथील शासकीय महाविद्यालयात आणले असून गंभीर जखमींना गोंदिया शासकीय महाविद्यालयात दाखल केले जात आहे.तर काही किरकोळ जखमींवर सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात तसेच डव्वा येथील प्राथमिक आरोग्य केंंद्रात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करुन सोडण्यात आले.
गावकरी मदतीला धावले
अपघाताची बातमी कळताच डव्वा येथील गावकऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेत बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. तसेच १०८ रुग्णवाहिका बोलावून त्यांना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच डुग्गीपारचे पोलीस निरीक्षक पथकासह घटनास्थळी दाखल झाले व मदत कार्याला सुरुवात करीत जखमी व मृतकांची ओळख पटविण्याकरीता त्यांना चांगलीच दमछाक करावी लागली.भंडारा येथील विभागीय आगार नियंत्रकासह गोंदिया आगार प्रमुखांनी घटनास्थळाकडे धाव घेतली होती.घटना मोठी असल्याने जिल्हाप्रशासनासह सर्वच मदतीला लागले होते.गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल व माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दाखल होत जखमींची विचारपूस केली.तसेच वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातासोबत चर्चा केली.
काही काळ वाहतूक ठप्प, नंतर सुरळीत
दरम्यान भीषण अपघातामुळे गोंदिया-कोहमारा मार्गावरील वाहतूक काही काळापूर्ती ठप्प झाली होती. गोंदिया जिल्हा वाहतूक पोलिसांनी लगेच घटनास्थळी दाखल होत या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या घटनेची माहिती मिळताच गोंदियाचे नवनिर्वाचित आमदार विनोद अग्रवाल माजी आमदार राजेंद्र जैन शासकीय महाविद्यालयात पोचून जखमींची विचारपूस केली,सोबत अपघातातील मृतकांच्या नातेवाईकाबद्दल माहिती घेतली.
अरुंद रस्ते अपघातास कारणीभूत
गोंदिया कोहमारा या राज्यमार्गाच्या रुंदीकरणाला गेल्या तीनचार वर्षापूर्वीच मंजूरी मिळालेली आहे.मात्र वन व वन्यजीव कायदा पुढे करुन या रस्त्याचे रुंदीकरण थांबले आहे.त्यातच गोंदिया ते मुंडीपार पर्यंत मार्ग रुंदीकरण झाले आहे.मात्र मुंडीपार ते कोहमारापर्यंत मार्ग अरुंद असल्याने नेहमी या मार्गावर अपघात होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मुंडीपार ते कोहमारापर्यंत मार्ग रुंदीकरण करणे गरजेचे असून, वेगावर नियंत्रण ठेवणेही तितकेच गरजेचे झाले आहे.
पुलाची रुंदी व उंची वाढविणे गरजेचे
डव्वा जवळील पूल अरुंद व कमी उंचीचा आहे. या पुलावर ह्यापूर्वी अपघात झाले असून मृत्यू देखील पावले आहेत. या पुलाची उंची व रुंदी वाढविणे गरजेचे असून पुलाच्या दोन्हीही बाजूला असलेली झाडे झूडपी काढणे देखील गरजेचे आहे.
मृत्यू पावलेल्या प्रवाशांची नावे :-
1) स्मिता विक्की सुर्यवंशी, वय- 32 वर्ष, राहणार- अर्जुनी मोरगाव, जि.गोंदिया
2) मंगला राजेश लांजेवार, राहणार- पिपरी, जि.भंडारा
3) राजेश देवराम लांजेवार, राहणार- पिपरी, जि.भंडारा
4) कल्पना रविशंकर वानखेडे, वय- 65 वर्ष, राहणार- वरोरा, जि.चंद्रपूर
5) रामचंद्र कनोजे, वय- 65 वर्ष, राहणार- चांदोरी, ता.साकोली, जि.भंडारा
6) अंजिरा रामचंद्र कनोजे, राहणार- चांदोरी, ता.साकोली, जि.भंडारा
7) आरिफा अजहर सय्यद, वय- 42 वर्ष, राहणार- घोटी, ता.गोरेगाव, जि.गोंदिया
8) अजहर अली सय्यद, वय- 45 वर्ष, राहणार- घोटी, ता.गोरेगाव, जि.गोंदिया
9) नयना विशाल मिटकर, वय- 35 वर्ष, राहणार- बेसा, नागपूर
टिप : मृत्यू पावलेल्या 2 प्रवाशांची अद्याप ओळख पटलेली नाही.
जखमी असलेल्या प्रवाशांची नावे :-
अ.क्र. प्रवाशांचे नाव वय पत्ता प्राथमिक उपचारासाठी हलविण्यात आलेल्या रुग्णालयाचे नाव
1 धृविका स्वप्नील हेमने ६ वर्षे नागपूर ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी
2 टिना यशवंत दिघोरे १७ वर्षे सोमलपुर ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी
3 नैतिक प्रकाश चोधरी ८ वर्ष कामठी ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी
4 श्रीकृष्ण रामदास उके २४ वर्ष कोसी, ता. भंडारा ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी
5 शारदा अशोक चौहाण ६३ वर्ष नागपूर ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी
6 पल्लवी प्रकाश चौधरी ३३ वर्ष कामठी ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी
7 लक्ष्मी धनराज भाजीपाले ३३ वर्षे गोंदिया ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी
8 स्वप्नील सुभाष हेमने ४० वर्ष नागपूर ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी
9 विद्या प्रमोद गडकरी ६३ वर्षे नागपुर ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी
10 भार्गवी राजेश कडू १५ वर्षे नागपर ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी
11 रविशंकर रामचंद्र वानखेडे ६५ वर्षे वरोरा प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा
12 संजय नेतराम दिघोरे ४१ वर्ष चिंगी प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा
13 रामकला संजय हुकरे ४६ वर्ष इंजोरी प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा
14 शंकर देवाजी हुकरे ५५ वर्ष इंजोरी प्राथमिक आरोग्य केंद्र इव्वा
15 नितीन पांडूरंग मते ४२ वर्ष भंडारा प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा
16 देवेंद्र मधुजी मेश्राम २५ वर्षे पालांदुर प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा
17 राहूल माधुरी कांबळे ३१ वर्ष वडगांव प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा
18 खफिजा सय्यद ६१ वर्षे घोटी प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा
19 वैभव गडकरी १९ वर्षे कदगाव के.टी.एस. रुग्णालय गोंदिया
20 अलतमस सैय्यद १५ वर्ष गोरेगाव के.टी.एस. रुग्णालय गोंदिया
21 अनंतराम धमगाये ७० वर्षे भंडारा के.टी.एस. रुग्णालय गोंदिया
22 प्रमिला भिमटे मुंडीपार ता. गोरेगाव के.टी.एस. रुग्णालय गोंदिया
23 रमेश गोविंदा आगरे ४६ वर्षे मानेगाव ता. लाखनी के.टी.एस. रुग्णालय गोंदिया
24 सुजित धनंजय रामटेके १९ वर्ष आतेगाव ता.साकोली के.टी.एस. रुग्णालय गोंदिया
25 दर्गावाई सोमवंशी ७० वर्षे सेलु ता. वर्धा के.टी.एस. रुग्णालय गोंदिया
26 मुकेश गणपत नागदेवे ३६ वर्षे निपरटोला ता. साकोली के.टी.एस. रुग्णालय गोंदिया
27 रोशनी रमेश आगरे ३८ वर्ष मानेगाव ता. लाखनी के.टी.एस. रुग्णालय गोंदिया
28 संताप कालीराम गजभिये ४६ वर्षे आतेगाव ता. साकोली के.टी.एस. रुग्णालय गोंदिया
29 योगेश्वरी केंद्रे के.टी.एस. रुग्णालय गोंदिया