31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता रानडुकराने धडक दिली, दुचाकीस्वार ठार

रानडुकराने धडक दिली, दुचाकीस्वार ठार

0
138

blank

नागपूर: रानडुकराने धडक दिल्यानंतर दुचाकीला झालेल्या अपघातात मोहन गोविंदराव लक्षणे (२२) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवळी (काळबांडे) येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक मोहन गोविंदराव लक्षणे (वय २२, देवळी काळबांडे) हा एमएच ४०, सीव्ही ९८०९ क्रमाकांच्या हीरो स्प्लेंडरने खासगी कंपनीत कामावर जात असताना वलनी नाल्याजवळ रान डुकरांच्या कळपाने त्याला धडक दिली. त्यातच खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. घटनेची माहिती मिळताच कोंढाळीचे उपनिरीक्षक शेख सलीम यांनी घटनास्थळी धाव घेत लक्षणेला अडेगाव प्राथमिक उपचार केंद्रात दाखल केले. तिथे डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

blank