गोंदिया ,दि.२९ःजिल्ह्यातील कोहमार-गोंदिया राज्य महामार्गावरील खजरी-डव्वा गावाजवळच्या वळणरस्त्यावर आज झालेल्या शिवशाही बसच्या भीषण अपघातात ११ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागल्याची हृदयविदारक घटना दुपारी १ वाजेच्या सुमारा आज(दि.२९)घडली.या घटनेने संपुर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश शोकमय झाले.४० प्रवाशांना घेऊन भंडारावरुन गोंदियाला निघालेल्या बसच्या चालकाचे बसवरील नियत्रंण सुटल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे.सदर अपघात आपल्या डोळ्याने बघणार्या एका युवकांने कुणाचीही वाट न बघता आपले वाहन रस्त्याच्या कडेला उभे करुन प्रवाशांना वाचविण्याकरीता धाव घेतली.त्या युवकाचे नाव जाबिर शेख असून तो गोंदियाचा रहिवासी आहे.आपल्या साहसाचे परिचय देत बसमध्ये फसलेल्या अनेक महिला,पुरुष व मुलांना बसच्या आत जाणार्या खिडकीचे काच फोडून बाहेर काढले.
या घटनेबद्दल बोलतांना जाबिर शेख म्हणाला की,दुपारी १२ वाजून ४४ मिनिटाच्या सुमारास हा अपघात घडला.या बसच्या चपेटमध्ये येण्यापासून आपण किमान ३० सेकदांच्या फरकाने आपण थोडक्यात बचावलो.तेवढ्यात बस ही रस्त्याच्या कडेला उलटून गेलेली होती.बसमधून महिला पुरुष मुलांच्या किंकाळ्या येत होत्या.तर अनेक प्रवासी बसच्या खालच्या भागात दाबले गेले होते.घटनास्थळावरील रक्त व परिस्थिती बघून बसच्या आत जायची कुणाचीच हिमंत होत नव्हती.परंतु आपण हिम्मत बांधत बसच्या आत जाणार्या खिडकीचे काच फोडून प्रवेश केला.व बसमध्ये फसलेल्या १५-१६ महिला पुरुष प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम त्याठिकाणी आलेल्यांच्या मदतीने केले.घटनेनंतर मदतीकरीता आपण गोरेगाव येथील आपले मित्र कदिर यांना फोन करुन मदतीकरीता रुग्णवाहिका व जेसीबीची पाठविण्याची विनंती केल्याचे सांगत बस सरळकरेपर्यंत आपण दीडतास त्याठिकाणीच हजर होतो.त्या घटनास्थळावरील जखमी प्रवाशांच्या आवाज व नातेवाईंकाचा मदतीकरीताचा टाहो बघून आपण सुन्न राहिल्याचे सांगितले.