26.6 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ राष्ट्रीय लोक अदालत 14 डिसेंबरला

राष्ट्रीय लोक अदालत 14 डिसेंबरला

0
82

गोंदिया,  दि.5 राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांचे निर्देशान्वये व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे मार्गदर्शनाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया यांचेमार्फत जिल्हा न्यायालय, कामगार न्यायालय, जिल्हा ग्राहक तक्रार  निवारण आयोग तसेच जिल्ह्यातील तालुका विधी सेवा समित्यार्मात सर्व तालुका न्यायालयामध्ये 14 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. न्यायालयात दाखल करण्यापूर्वीचे प्रकरणे तसेच न्यायालयात दाखल असलेली तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, एन.आय.ॲक्ट कलम 138, बँक रिकव्हरीची प्रकरणे, वैवाहिक/कौटुंबिक वादाची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, भूसंपादनाची प्रकरणे, दिवाणी प्रकरणे- भाडे, बँक वसुली, प्राधिकरणाची कर्ज वसुली प्रकरणे, विद्युत व पाणी बीलाची (चोरीची प्रकरणे सोडून) इत्यादी तसेच सर्वच प्रकारची तडजोडपात्र दाखल तसेच दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.

प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याकरीता न्यायाधीश, तज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे पॅनल मदत करणार आहे.

तरी ज्या पक्षकारांनी आपली दाखल प्रकरणे सदर लोक अदालतीमध्ये तडजोडीकरीता ठेवायची आहेत त्यांनी संबंधित न्यायालयात 13 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज दाखल करावा. तसेच दाखलपूर्व सर्व बँकांनी, संबंधितांनी किंवा अर्जदारांनी सुध्दा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया येथे किंवा तालुका विधी सेवा समितीकडे 13 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावा.

सर्व संबंधित पक्षकारांनी त्यांची प्रकरणे सदर लोक अदालतीमध्ये तात्काळ निकाली काढून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद वानखेडे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव नरेश वाळके यांनी केले आहे.

blank