युवकांनी समाज उभारणीच्या प्रक्रियेत स्वयंस्फुर्तीने योगदान द्यावे – रमेश चाकाटे

0
50

गोंदिया, दि.5 देशाची प्रगती ही त्या देशातील युवकांच्या कार्यावरुन ठरवली जाते. देशाला सुदृढ व संपन्न बनवायचे असेल तर युवकांनी समाज उभारणीच्या प्रक्रियेत स्वयंस्फुर्तीने योगदान द्यावे, असे प्रतिपादन राखीव पोलीस निरीक्षक रमेश चाकाटे यांनी केले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, नेहरु युवा केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन बुध्दिष्ट समाज संघ संस्थागार, गोंदिया येथे आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी श्रुती डोंगरे, जिल्हा समुपदेशक डायट मिलिंद रंगारी, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, एन.एम.डी. कॉलेजचे प्राध्यापक डॉ.बबन मेश्राम, राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राध्यापिका संगिता घोष, तालुका क्रीडा अधिकारी सडक अर्जुनी ओमकांता रंगारी, बॅडमिंटन संघटनेचे सचिव अनिल सहारे, सुनिल पारधी उपस्थित होते.

प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दिप प्रज्वलन करण्यात आले.

यावेळी अध्यक्षीय भाषणातून नंदा खुरपुडे यांनी सांगितले की, विज्ञान व तंत्रज्ञान हे मानवी विकासाचे महत्वपूर्ण घटक आहेत. युवक हे नवीन माध्यमांची ओळख व त्यातील माहिती घेण्यासाठी उत्सुक व जिज्ञासू असतात. तसेच युवकांमध्ये नवीन संकल्पना, प्रयोगशिलता व शोधवृत्ती असते, त्यामुळे युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या.

याप्रसंगी प्राध्यापक बबन मेश्राम, समुपदेशक मिलिंद रंगारी, प्राध्यापिका संगीता घोष, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांनीही युवकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा अधिकारी ए.बी. मरसकोले यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचा उद्देश व आयोजनाबाबत विस्तृत माहिती विशद केली.

युवा महोत्सवाचे आयोजन उत्साही व चैतन्यमय वातावरणात करण्यात आले. यामध्ये जवळपास 100 कलाकारांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचे परीक्षक म्हणून बबन मेश्राम, मिलिंद रंगारी, संगीता घोष, सविता बेदरकर, सुनिल पारधी, इब्राहीम शेख, राजकुमार पटले, आशिष सहारे, अभय गुरव, अरुण नशिने, शिखा पिपलेवार, सुरज नशिने, राजु टेंभूर्णेकर, श्वेता चौरसिया, हॅरी फ्रांसीस यांनी काम पाहिले.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे. लोकगीत (समुह)-पंचशील हायस्कुल मक्काटोला ता.सालेकसा. लोकनृत्य (समुह)-अनुसूचित जाती व नवबौध्द निवासी शाळा डव्वा ता.सडक अर्जुनी. वक्तृत्व स्पर्धा : प्रथम- अनुसयाबाई पशिने हायस्कुल दासगाव अस्मिता बिसेन, द्वितीय- एनएमडी कॉलेज गोंदिया मोसम पटले, तृतीय- एम.बी.पटेल कॉलेज देवरी चंद्रभान हिरवानी. कविता लेखन : प्रथम- शंकरलाल अग्रवाल सायंस कॉलेज सालेकसा दिपलेश दसरिया, द्वितीय- जी.के.महिला महाविद्यालय कावराबांध रुपाली ठवरे, तृतीय- लक्ष्मणराव मानकर महाविद्यालय आमगाव पायल कोडापे. कथा लेखन : प्रथम- मनोहरभाई पटेल कॉलेज सालेकसा कुणाल नोनारे, द्वितीय- छत्रपती शिवाजी कॉलेज देवरी अजिंक्य शहारे, तृतीय- शंकरलाल अग्रवाल सायंस कॉलेज सालेकसा रोहितकुमार बेंठवार. चित्रकला स्पर्धा : प्रथम- शंकरलाल अग्रवाल सायंस कॉलेज सालेकसा सानिध्य गजभिये, द्वितीय- कालीमाटी महाविद्यालय गोरेगाव रोशन येडे, तृतीय- उमेश गायधने. सायंस प्रदर्शनी (वैयक्तिक) प्रथम- आकांशा नंदेश्वर, द्वितीय- ओम चुटे, तृतीय- यामिनी खुटांडे. सायंस प्रदर्शनी (समुह) प्रथम- सलोनी बोहरे, द्वितीय- सौरव मेंढे, तृतीय- हेमंत बाहेकार, पंचशिल हायस्कुल मक्काटोला ता.सालेकसा.

  वर्धा येथे आयोजित होणाऱ्या विभागीय युवा महोत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बाबनिहाय कलाकार गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  रविंद्र वाळके, आकाश भगत, पुनम दमाहे, जयश्री भांडारकर, निकिता बोरकर, शिवचरण चौधरी, विनेश फुंडे, शेखर बिरनवार, किशन गावड, अनिल बागडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्रीडा अधिकारी ए.बी. मरसकोले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार क्रीडा मार्गदर्शक अविनाश निबांर्ते यांनी मानले.