गोंदिया,दि.०९–संत महापुरुष हे कोण्या एका जातीचे नसतात,तर राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराजांनी मानव जातीच्या कल्याणासाठी काम केले.यामुळेच ते मानव जातीचे उद्धारक असल्याचे विचार ओबीसी अधिकार मंचचे संयोजक व बेरार टाईम्सचे संपादक खेमेंद्र कटरे यांनी व्यक्त केले.ते येथील एम.जी.पॅरामेडिकल काॅलेजमध्ये(दि.०९)आयोजित संत संताजी जगनाडे महाराजांच्या जयंती कार्यक्रमात बोलत होते.पुढे म्हणाले की,संत महापुरुषांनी केलेल्या कार्यामुळेच आज 400 वर्षांनतरही संताजींचे विचार त्यांच्या जयंतीच्या माध्यमातून समजून घेत आहोत.संत तुकाराम महाराजांच्या गाथा बुडविण्यात आल्या असल्या परंतु त्यांचे अभंग हे जगनाडे महाराजांना मुखाग्र होते म्हणून आम्ही त्यांचे विचार जाणू शकलो.संत तुकाराम महाराजांचे, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत जगनाडे महाराज हे शिष्य होते.त्यांच्यासारखे विचार व कार्य आपण सर्वांनी अंगिकारावे असेही कटरे म्हणाले.कार्यक्रमाला ओबीसी संघर्ष समितीचे कोषाध्यक्ष कैलाश भेलावे,संताजी अर्बन बँकेचे संचालक बळीराम डोरले,बहुजन एकता मंचचे सुनिल भोंगाडे,सामाजिक कार्यकर्ता गौरव बिसेन,काॅलेजचे संचालक अनिल गोंडाने,प्राचार्या अनुसया लिल्हारे,प्रा.प्रिती वैद्य,प्रा.छाया राणा,प्रा.रामेश्वरी पटले,प्रा.आरती चैधरी,प्रा.गायत्री बावनकर,राजू रहांगडाले,सौरभ बघेले,राजाभाऊ उंदिरवाडे,श्रीमती योगेश्वरी ठवरे व श्रीमती रूपाली धमगाये हे सर्व कर्मचारी उपस्थित होते.जंयती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी प्रतीनिधी कु.शिवानी बघेले हिने केले,तर कार्यक्रमाचे आभार प्रा. मनीष चौधरी यांनी मानले.