अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यू

0
110
file photo

नागपूर : नागपूर वनविभागाच्या रामटेक वन परिक्षेत्रातील कांद्री मनसर-जबलपूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यू झाला. पेंच व्याघ्र प्रकल्प परिसर घटनास्थळाजवळ आहे. त्यामुळे महामार्ग ओलांडून पलीकडे जात असताना बिबट्याचा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने बिबट्याच्या जबड्याला धडक दिली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच रामटेक वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत व वन कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पंचनामा केल्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उपवनसंरक्षक डॉ. भरतसिंह हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी भगत, क्षेत्र सहाय्यक गोडी मेश्राम, गोमासे व पथक पुढील तपास करीत आहेत.