गोंदिया : जिला अधिवक्ता संघाच्या वतीने २०२५ अॅडव्होकेट डायरी तथा कॅलेडंरचे विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड.टी.बी.कटरे होते. अतिथी म्हणून प्रमुख सत्र व जिल्हा न्यायाधिश अरविंद वानखेडे, जिल्हा अधिवक्ता संघाचे सचिव अॅड.रुपेंद्र कटरे आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अॅडव्होकेट डायरी तथा कॅलेंडरचे प्रमुख सत्र व जिल्हा न्यायाधिश अरविंद वानखेडे यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थितांचे आभार अधिवक्ता संघ सहसचिव अॅड.विश्वनाथ रहांगडाले यांनी केले.