तिरोडा :- जागतिक हिंदी दिनाच्या शुभ मुहूर्तावर जागतिक हिंदी दिनाच्या शुभ मुहूर्तावर प्रान्ति इंडिया अँड कंपनी या संस्थेच्या वतीने 10 जानेवारी 2025 रोजी वाराणसी येथे आयोजीत वार्षिक महोत्सव 2025 चा भव्य कार्यक्रमात तिरोडा येथील मराठी, हिंदी व पोवारी बोली चे सुप्रसिध्द कवी व गझलकार (साहित्यिक) अँड. देवेंद्र घनश्याम चौधरी यांना”प्रान्ति इंडिया साहित्य पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले आहे.
जागतिक हिंदी दिनाच्या शुभ मुहूर्तावर “प्रान्ति इंडिया अँड कंपनी” या नामांकित साहित्यिक संस्थेच्या वतीने 10 जानेवारी 2025 रोजी पराडकर भवन, मैदागनी, वाराणसी येथे वार्षिक महोत्सव 2025 चा आयोजन करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात भारत देशातील 111 साहित्यिकांना “प्रान्ति इंडिया साहित्य सन्मान 2025” ने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे या नामांकित वार्षिक महोत्सवात अतिरिक्त ५१ साहित्यिकांना ‘प्रान्ति इंडिया साहित्य सन्मान’ स्वरूपात शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह चांदीचे नाणे तसेच नकद पुरस्कार ही देण्यात आले. हे विशेष की, त्या ५१ साहित्यिकात तिरोडा चे कवी अँड. देवेंद्र चौधरी यांचा ही समावेश आहे. कवी अँड. देवेंद्र चौधरी यांना हिंदी साहित्य, हिंदी ची उपबोली म्हणजे पोवारी बोली आणि राष्ट्रभाषा हिंदीच्या संवर्धनासाठी केलेल्या कार्य आणि सेवेची भावना लक्षात घेऊन त्यांना “प्रान्ति इंडिया साहित्य सन्मान 2025” पुरस्काराने वाराणसी येथील मैदागीन येथील पराडकर स्मृती भवन येथे दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता सन्मानित करण्यात आले.
हे विशेष की, कवी अँड. देवेंद्र चौधरी यांच्या पोवारी बोली, हिन्दी आणि मराठी भाषेत एकूण 5 पुस्तक प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांना आजपर्यंत त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर, राज्यस्तरावर अनेकदा पुरस्काराने व सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. मागील वर्षी नेपाळ देशामध्ये आयोजित विश्व प्रतिभा आंतरराष्ट्रीय सन्मान समारोह मध्ये सन्मानीत करण्यात आले आहे. कवी अँड. देवेंद्र चौधरी यांनी मध्यप्रदेश मधील पांढुरना येथील अखिल भारतीय तिसरे पोवारी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील भूषविले असून सदर सन्मान, पुरस्कार हा त्यांच्या साहित्याच्या कारकीर्दीत भर टाकणारा आहे. तसेच ते नागपूर आकाशवाणी केंद्रातून देखील त्यांचा काव्यपाठ प्रस्तूत झालेला आहे. त्यांना त्यांच्या मिळालेल्या सन्मानाबद्दल वकील संघ, तिरोडा, जिल्ह्यातील पोवार समाज बांधव व मित्र परिवाराने त्यांचे कौतुक केले आहे.