वर्धा दि.२२:र्जिल्ह्यातील समुद्रपूर वनपरिक्षेत्रामधील गिरड भागात गाडीखाली चिरडलेला वाघाचा मृतदेह आढळला. हा मृतदेह वाघाच्या मादी बछड्याचा असल्याचे समोर आले आहे. तर पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी भागात वाघाचा मृतदेह आढळला असून वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील वाघांच्या मृत्यूची संख्या गंभीर होत चालली आहे. शिकारामुळे आणि अंडरपास किंवा ओव्हरपास न बांधता तयार केलेले रस्ते आणि रेल्वे मार्गिकेवर वाघांचा मृत्यू होत आहे.