दुचाकीला अचानक लागली आग

0
137

गोंदिया : शहरातील एका दुचाकी दुरुस्तीच्या दुकानातील एका दुचाकीला अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले. ही घटना आज बुधवार सकाळीच्या सुमारास घडली. मात्र, लगेच पाणी टाकून आगीवर नियंत्रण आणल्याने मोठा अनर्थ टळला.
शहरातील टीव्हीएस शोरूम जवळील ओम साई पियूसी सेंटरला लागून असलेल्या दुचाकी दुरुस्तीची दुकान असून याच दुकानामधील एका दुचाकीला अचानक आग लागली. ही घटना आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. ही आग थोडक्यात भडकली असता पेट्रोल टाकीला आग लागली. याचे गांभीर्य घेत शेजारील नागरिकांनी आगीवर नियंत्रण आणण्याकरिता पाणी व वाळू टाकले. दरम्यान नागरिकांच्या सतर्कतेमुळे आगीवर नियंत्रण आणण्यात आले. मात्र या आगीत दुचाकी जळाल्याने मालकाचे मोठे नुकसान झाले. मात्र, सुर्दैवाने मोठा अनर्थ टळला.