गोंदिया, दि.22 : नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांनी आज येथील जिल्हा माहिती कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटूडे व उपसंपादक कैलाश गजभिये यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी डॉ. गणेश मुळे यांनी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत जास्तीत जास्त विकास कामांना प्रसिध्दी देण्याची सूचना केली.
आस्थापना शाखेची माहिती घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. कार्यालयात येणारे पत्रकार, नागरिक यांच्याशी सौजन्याची वागणूक ठेवावी असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी यांचेकडून बिंदूनामावलीनुसार या कार्यालयाच्या आस्थापनेवर मंजूर पदे किती आहेत याबाबत विचारणा करुन भरलेली पदे किती व रिक्त पदे किती आहेत तसेच कार्यालयाच्या वाहनाची स्थिती काय आहे याबाबत विचारणा केली.यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.