माजी जि.प.सदस्य किशोर तरोणे यांचे जनसंपर्क कार्यालयात भेंडारकर यांचा सत्कार

0
109

*जगात शांती आणी समृध्दी नांदण्यासाठी बुध्दाचे विचारांची गरज :- जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर*

अर्जुनी मोर. —आज जगातल्या काही देशांमधे युध्दजन्य परिस्थीती निर्माण झाली आहे.जिवीत हाणीसह मालमत्तेचीही मोठी हानी होवुन अनेक देश डबघाईस आले आहेत. आतंकवाद, दहशतवाद,नक्षलवाद यामुळे अनेक देश संकटात आहेत.त्यामुळे जगात शांती आणी समृध्दी नांदण्यासाठी तथागत बुध्दाचे विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन गोंदिया जिल्हा परिषद चे नवनिर्वाचित अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवा नेते किशोर तरोणे यांचे नवेगाव बांध येथील जनसंपर्क कार्यालयात (ता.30) आयोजित सत्कार कार्यक्रमात लायकराम भेंडारकर बोलत होते.
यावेळी नवनिर्वाचित जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांचा भगवान बुध्द आणी त्यांचा धम्म हा ग्रंथ देवुन किशोर तरोणे ,पत्रकार रामदास बोरकर,अविनाश कापगते व अन्य मान्यवरांचे उपस्थितीत सत्कार करण्यात आला.यावेळी विविध विषयावर चर्चा सुद्धा करण्यात आली. विशेष करून नवेगाव बांध परिसरातील व नवेगाव बांध पर्यटन या विषयावर विशेष चर्चा करून नवेगाव बांध पर्यटनाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल व या परिसरात रोजगाराच्या संधी निर्माण कशा करता येईल यावर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे नवेगाव बांध येथील जिल्हा परिषद हायस्कूल ला लागणाऱ्या विविध सोयी सुविधा उपलब्ध करून शैक्षणिक दर्जा सुधारण्याकरिता उपाययोजना करण्याबाबत विनंती करण्यात आली. तसेच अर्जुनी मोरगाव तालुक्यात चालू असलेल्या चारही प्रादेशिक पाणीपुरवठा या वाढलेल्या खर्चामुळे डबघााईस आलेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या एक एप्रिल पासून त्या बंद होणार आहेत. अशा परिस्थितीत त्या बंद होऊ नयेत व पाणीपुरवठा तालुक्यातील जनतेला सुरळीत सुरू राहावा याकरिता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे विशेष सभा आयोजित करून लवकरच पाणी टंचाई समस्यावर मार्ग काढण्याचे आश्वासन आजच्या भेटीदरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी दिले.