गोंदिया-आज गोंदिया भंडारा जिल्ह्यात जे शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे,त्या वातावरणामुळे येथील शिक्षित पिढी देशाच्या विकासात हात लावण्यायोग्य तयार करण्याचे काम कुणी केले असेल तर ते शिक्षणमहर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांनी.स्वतःला न मिळालेल्या शिक्षणाची संधी इतराना मात्र मिळावी याकरीता शाळा सुरु करुन शिक्षणाची गंगा प्रवाहीत करण्याचे कार्य करणारे स्व.मनोहरभाई हे आमच्यापेक्षा अधिक शिक्षित होते असे विचार केद्रीय उद्योग व वाणिज्य मंंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केले.

ते गोंदिया येथील डी.बी.सायंस महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त आयोजित सुवर्णपदक वितरण कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल पटेल होते.यावेळी मंचावर जुबिलेंट साइंसेज प्रबंध निदेशक हरिशंकर भरतिया,माजी खासदार नरेश गुजराल, उद्योगपती मोहित गुजराल, गोंदिया शिक्षण संस्थाेच्या अध्यक्ष वर्षाताई पटेल,श्रीमती गोयल,जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर,सर्वश्री आमदार विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले,इजिं.राजकुमार बडोले,राजू कारेमोरे,डॉ. परिणय फुके,सेवक वाघाये,संस्थेचे संचालक प्रज्वल पटेल,गोंदिया जि.प.उपाध्यक्ष सुरेश हर्षे,सभापती पुजा सेठ,भंडारा जि.प.उपाध्यक्ष फेंडर,माजी खासदार सुबोध मोहीते,संजय खोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना ना.गोयल म्हणाले की,दिल्लीतील आपदा सरकार गेली असून देशाच्या राजधानीचा विकासाची दारे उघडली गेली आहेत.केंद्रातील सरकार शिक्षणासोबतच शेतकरी महिलाच्याबाबतीतही विचार करीत आहे.तर नक्षलग्रस्त गडचिरोलीच्या विकासाची दारे उघडली गेली असून उद्योगाच्या क्षेत्रात नवी भरारी घेणार असल्याचे सांगत केंंद्रीय गृहमंत्र्यांनी नक्षलवादापासून २०२६ पर्यंत भारत नक्षलमुक्त करण्याचा संकल्प घेतला आहे.

गोयल म्हणाले की,या भागातील जनतेच्या प्रेमापोटील प्रफुल्ल पटेल सलग 34 वर्षे खासदार आहेत.त्याच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले.ते अनेकदा गोंदिया आणि भंडाराच्या विकासाबद्दल बोलत असत आणि त्याचे गुणगान गात असत.आज आपणास मात्र त्यांनी केलेले कार्य प्रत्यक्ष बघायला मिळाले याचा आनंद आहे.याठिकाणी जे दिसले ते अभूतपूर्व आणि अकल्पनीय होते.आत्ता प्रफुल भाईनी नर्सिग महाविद्यालय सुरु करुन आरोग्याच्या क्षेत्रात भरारी घ्यावी कारण आज देशातच नव्हे तर विदेशातही नर्सिंगच्या मुलींची मागणी मोठ्या प्रमाणात आहे.त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील व्याघ्रप्रकल्प बघायला पुढे नक्की येणार असून पर्यटनाच्या क्षेत्रातही रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे म्हणाले. 

केंद्रीय मंत्री पियुष गोयल पुढे म्हणाले, समाजातील लोकांमध्ये काम करणारा नेता हाच खरा जननेता असतो. मनोहरभाई पटेल यांनी या भागासाठी केलेले कार्य अविस्मरणीय आहे.आज त्यांच्या कार्याला आत्मसात करून प्रफुल्लभाईनी ते पुढे नेण्याचे काम केले आहे.प्रफुल्ल पटेल आणि वर्षाताईंचा मी ऋणी असून समाजासाठी आयुष्य समर्पित करणारे हे कुटुंब धन्य आहे.अशा कुटुंबाचे मी आभार मानतो.यावेळी जुबिलेंट साइंसेज प्रबंध निदेशक हरिशंकर भरतिया,माजी खासदार नरेश गुजराल यांनीही विचार व्यक्त केले.

खासदार प्रफुल पटेल यांनी प्रास्तविकात गोंदिया शिक्षण संस्थेच्या कार्यासोबतच मनोहरभाईंच्या जिवनगाथा उलघडण्याचा प्रयत्न करीत आपल्या क्षेत्रात तांदुळ उद्योगाला चालना देण्याकरीता मदत व फार्मासारख्या उद्योगाला संधी असल्याचे पाहुण्यांच्या निदर्शनास आणून दिले.यावेळी दहावी बारावीसह पदवीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व पत्रकार,उत्कृष्ठ शेतकरी आदींचा सुवर्ण पदक देऊन सन्मान करण्यात आला.संचालन शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन यांनी केले.राष्ट्रगितांने कार्यक्रमाची सांगता झाली.