प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पहिला हप्ता वाटप व मंजूरीपत्र वितरण कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद

0
135
  •  गोंदिया 22:- प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वाटप तसेच 20 लाख लाभार्थ्यांना मंजूरी पत्र देण्याचे कार्यक्रम आज (दि. 22) रोजी जिल्हा परिषद गोंदिया येथील वसंतराव नाईक सभागृह येथे आयोजित करण्यात आले.

            सदर कार्यक्रमात उपस्थित मान्यवर म्हणून अध्यक्षपदी अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया लायकराम भेंडारकर लाभलेले होते. तसेच आमदार विनोद अग्रवाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे,मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, सभापती समाज कल्याण रजनी कुंभरे, सभापती पंचायत समिती गोंदिया मुनेश रहांगडाले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत मधुकर वासनिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग फरेंद्र कुतीरकर, प्रकल्प संचालिका प्रमिला जाखलेक ह यावेळी उपस्थित होते. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री. बाबासाहेब पाटील व्ही.सी (दूरदृश्यनप्रणाली) द्वारे कार्यक्रमास उपस्थित होते.

            ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा- 2: सन 2024-25 चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यातील 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र तसेच 10 लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे अनुदान निधी वितरीत करण्यात आले.

            केंद्रीय गृहमंत्री, अमित शाह यांच्या शुभ हस्ते तसेच मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमास मा.एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जयकुमार गोरे मंत्री, ग्रामविकास व पंचायत राज,  योगेश कदम, राज्यमंत्री ग्रामविकास व पंचायत राज यांची विशेष उपस्थिती होती. व्ही.सी.द्वारे 2 –Way Communication सुविधा मार्फत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सदर कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले.

            गोंदिया जिल्ह्यात 34 हजार 63 लाभार्थ्यांना घरकुल मंजूरीचे आदेश पत्र प्राप्त झाले असून बांधकाम प्रक्रीयेसाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध झालेला आहे. राज्य शासनाच्या ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमाद्वारे लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्राप्त होणार आहे.

            मंचावर उपस्थित मान्यवरांनी योजनेविषयी मनोगत व्यक्त केले व योजनेची कामे वेळेवर व पारदर्शकपणे पूर्णपणे होणार असल्याचे आश्वासन दिले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालिका श्रीमती प्रमिला जाखलेकर यांनी  केले. कार्यक्रमास जिल्ह्यातील लाभार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

          यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामीण गृह निर्माण अभियंत्यांचे प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व लाभार्थ्यांना घरकुलांचे मंजुरी पत्र वितरीत करण्यात आले. कार्यक्रमस्थळी लाभार्थ्यांकरिता आरोग्य तपासणी शिबीर, आधार अपडेशन कॅम्प, आयुष्यमान भारत कार्ड काढण्याचे कॅम्प ची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली खोब्रागडे, विस्तार अधिकारी सांख्यिकी यांनी केले तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य, फरेन्द्र कुतीरकर यांनी मानले.