डोंगरगाव येथे वाघाने केली गायीची शिकार..

0
336

गोठ्यात शिरून गायीची शिकार : डोंगरगावात नागरिकांमध्ये दहशत, नुकसान भरपाईची मागणी

अर्जुनी मोरगांव : तालुक्यातील डोंगरगाव/कवठा येथे (दि.२२फेब्रु) सायंकाळी ६.४५ वाजता पट्टेदार वाघाने गोठ्यात घुसून गायीची शिकार केल्याची घटना घडली. रामकृष्ण लांडगे (वय ४५) डोंगरगाव यांच्या गोठ्यात हा प्रकार घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, रामकृष्ण लांडगे यांच्या गायीला गोठ्यात ठेवले असताना अचानक वाघाने हल्ला केला आणि काही क्षणांतच तिचा फडशा पाडला. हा थरारक प्रकार पाहून घरातील सदस्य घाबरले, मात्र वाघ लगेचच जंगलाच्या दिशेने निघून गेला. वन विभागाची दखल – तपास सुरू घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून गायीच्या नुकसानीचा अहवाल तयार करण्यात आला आहे. तसेच वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात कॅमेरे बसवण्याची शक्यता आहे.

मला नुकसान भरपाई तातडीने दया.- रामकृष्ण लांडगे
सदर घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, शेतकरी व ग्रामस्थांनी वन विभागाने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात. तसेच रामकृष्ण लांडगे यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.