अर्जुनी-मोर.२४ फेब्रुवारी – गोंदिया येथील सांस्कृतिक मंडळाच्या शंभर महिला सदस्यांनी आज नवेगाव बांध पर्यटनस्थळाला भेट देत संपूर्ण दिवस पर्यटनाचा आनंद लुटला. या दौऱ्यात महिलांनी नव्याने सुरू झालेल्या एमटीडीसी रिसॉर्टला भेट देत संपूर्ण परिसराचा आढावा घेतला.
यानंतर महिलांनी रॉक गार्डन, बोटिंग, ग्रीन पार्क, हॉटेल तसेच इतर पर्यटनस्थळांचा आस्वाद घेतला. या वेळी सांस्कृतिक मंडळाच्या प्रमुख श्रीमती वर्षा प्रफुल पटेल उपस्थित होत्या. त्यांनी पर्यटन स्थळाच्या विविध सुविधा आणि सौंदर्याचा आनंद घेतला.
नवेगाव बांध हे राष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्यामुळे ते प्लास्टिक मुक्त ठेवण्यासाठी विशेष काळजी घेण्याचा संदेश देण्यात आला. पर्यटकांनी सिंगल-यूज प्लास्टिकचा वापर करून परिसरात घाण करू नये, यासाठी दंडात्मक कारवाईचे फलक ग्रीन पार्क हॉटेलमध्ये श्रीमती वर्षा पटेल यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंडळाच्या सर्व महिला सदस्यांनी हजेरी लावली होती. अर्जुनी मोरगाव येथून श्रीमती मनीषा तरोणे, शिशूकला हलमारे, आम्रपाली डोंगरवार, दीक्षा शहारे, मंजुषा बारसागडे ,नंदा गहाणे आदी महिला उपस्थित होत्या.सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत चाललेल्या या दौर्यात महिलांनी नवेगाव बांध परिसराचा मनमुराद आनंद घेतला. या प्रसंगी मनोहरभाई पटेल अकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती वर्षा पटेल यांनी या दौर्याबाबत समाधान व्यक्त केले.