33.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ हिंदी भाषा शिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर समारोहाचे आयोजन

हिंदी भाषा शिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर समारोहाचे आयोजन

0
81

गोंदिया -येथील विवेक मंदिर शाळेच्या सभागृहात महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे आणि गोंदिया जिल्हा हिंदी अध्यापक गोंदिया जिल्हा हिंदी अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय शिबिराचा आयोजन विवेक मंदिर हिंदी शाळा गोंदिया येथे घेण्यात आले.
या शिबिराला शिक्षणाधिकारी माध्यमिक विशाल डोंगरे, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गोंदिया ज्ञानेश्वर दिघोरे ,संस्थापक अध्यक्ष विवेक मंदिर सीबीएससी स्कूल गोंदियाचे दिलीपकुमार मंगलचंद जैन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर नीला बोरवणकर. राष्ट्रभाषा सभा पुणेचे सचिव रविकिरण गळंगे परीक्षा विभागाच्या सुचित्रा कुलकर्णी यांनी शिक्षकांना हिंदी भाषेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विशाल डोंगरे, ज्ञानेश्वर दिघोरे, दिलीपकुमार मंगलचंद जैन ,अशोक कारता, नीता कार्व्हट, सुनील ठाकरे, निखिलेस सिंग, प्रदीपकुमार मेश्राम ,प्राचार्य नीता कारवट, प्राचार्य रिजवाना अहमद शेख, नवीनकुमार झरारिया, यांच्या याप्रसंगी शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणेचे सचिव परीक्षा विभागाचे सुचित्रा कुलकर्णी महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे चे सचिव रविकिरण गडंगे महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे ते प्रचार शिक्षण प्रमुख वृंदा कुलकर्णी यांनी हिंदी विषयावर मार्गदर्शन करून शिक्षक वृंदांना मंत्रमुग्ध केले
. दुसरा सत्र मार्गदर्शन सुचित्रा कुलकर्णी यांनी केले तर हा दुसरा सत्र प्राचार्य डी आर गिरीपुंजे, प्राध्यापक रविकिरण गडगे, डॉक्टर हरीशकुमार खत्री ,आर एस वैष्णव ,नवीनकुमार झरारिया, प्रदीपकुमार मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्र घेण्यात आला यावेळी विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन प्रदीकुमार मेश्राम, प्रास्ताविक रवीकिरण गडंगे, आभारप्रदर्शन सुनिता सुभाष मुंजे यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिता मुंजे, संगीता सलामे, नरेंद्र इटणकर, बबन मोखारकर ,राजू निमजे ,हितेंद्र पारधी, प्राचार्य डी आर गिरीपुंजे, आर एस मेश्राम, डॉक्टर हरीशकुमार खत्री, आर एस वैष्णव, घनश्याम कुंबरे, नंदकिशोर भगत ,निखाडे दुष्यंतकुमार जयस्वाल, एच जी बावनकर ,लता ननावरे, पी एच पटले, एम एन असाटी, कुमुद बीसेन, नागेश नंदेश्वर, सुषमा नागपुरे, धर्मेंद्रकुमार ठाकूर, नरेश कोरे ,होमेंद्र कटरे, बघेले, मनीषा सपाटे, विशाखा गौतम, मनोज पटले, शरणागत, आर पी कटरे तसेच सर्व शिक्षक शिक्षिका यांनी मोलाचे सहकार्य केले.