चित्रा कापसे/तिरोडा–नेहरू वॉर्ड शिव मंदिर पारस नगरी समोरील रस्ता गटार लाइनच्या ढिसाळ कामामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. चिखल, खड्डे आणि उखडलेले रस्ते यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या असह्य परिस्थितीचा निषेध करीत नेहरू वॉर्ड निवासी संतापले असून लोकांना येण्या जाण्या करिता कच्चा रस्ता होता तो पण गटार लाइन योजना मुरे रस्ता दिसेनासा झाला असून मुलांना शाळेत येणे जाणे कठीण झाला आहे अशा नागरिकांची व्यथा आहेत.
जवळपास सहा महिन्यांपूर्वीपासून शहरात गटार योजनेची कामे सुरू आहेत. सुमारे ६० टक्के भागात रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून पाइप व चेंबर टाकण्यात आले; पण या कामानंतरची योग्य पुनर्बाधणी पूर्णतः दुर्लक्षित केली गेली. खोदकामानंतर त्या ठिकाणी माती अथवा मुरूम टाकून रोलरने समपातळी करणे गरजेचे होते. मात्र, कंपनीने ते टाळले. परिणामी, संपूर्ण तिरोडा शहरात रस्ते खड्ड्यांनी भरले असून, नागरिकांना चालणे, वाहने चालवणे मुश्कील झाले आहे. चिखल, खड्डे आणि उखडलेले रस्ते यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या असह्य परिस्थितीचा निषेध नोंदवत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासा, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून अनेकजण घसरून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. चिखल, खड्डे आणि धोकादायक
रस्त्यांवरून चालताना कोण अधिक काळ तग धरतो, यावर नगर पालिका समितीने रस्त्यांच्या दुरवस्थेवर तातडीने उपाययोजना करण्याची विनंति नेहरू वॉर्ड निवासी करत आहे
प्रशासनाने कंपनीवर कारवाई करून रस्त्यांचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली. परंतु, अजूनही प्रशासनाने कोणतीही भूमिका घेतली नाही.




