
आमगाव,दि.०१- तालुक्यातील ठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात दि.31 जुलै रोजी जन आरोग्य समितीची सभा जिल्हा परिषद सदस्य ठाणा हनवंतजी वट्टी व जिल्हा परिषद गोरठा छबुताई उके यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली.सुरवातीला सभेचे प्रास्ताविक व मागील सभेचे ईतीवृत्त वाचन प्राथमिक आरोग्य केंद्र ठाणाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रेमकुमार बघेले यांनी केले.
या सभेमध्ये विविध आरोग्य विषयक कामकाज व समस्यांवर चर्चा करण्यात आली, तसेच आरोग्य संस्थेत पुढिल आर्थिक व भौतिक बाबीवर चर्चा करुन नियोजन करण्यात आल्याची माहीती वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रेमकुमार बघेले यांनी दिली आहे.जन आरोग्य समितीचे दोन्ही जिल्हा परिषद सदस्य हनवंतजी वट्टी व छबुताई उके यांनी आरोग्य संस्थेतील अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यक्षेत्रातील लोकांना गुणवत्तापुर्ण आरोग्य सेवा देण्याचे निर्देषित करुन आरोग्य संस्थेच्या समस्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोडविल्या जातील अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.
जन आरोग्य समितीनेनंतर “एक पेड मॉ के नाम” उपक्रम अंतर्गत दोन्ही अध्यक्ष हनवंतजी वट्टी व छबुताई उके यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.ठाणा आरोग्य संस्थेच्या परिसरात “एक पेड मॉ के नाम” वृक्षारोपण करुन पर्यावरणासाठी सर्वांनी योगदान करण्याचे आवाहन ह्याप्रसंगी केले.व नंतर वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रेमकुमार बघेले,डॉ.सचीन बारई,डॉ.भुमेश बिसेन, डॉ.मिलिंद मेश्राम तसेच प्रा.आ.केंद्र ठाणा येथील सर्व सामुदायिक आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आशा सेविका यांचे उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी झाला.
सभेला व वृक्षारोपणाला यावेळी माजी जि.प.सदस्य शोभेलालजी कटरे,पं.स.सदस्य राजेंद्रजी गौतम,सुनंदाताई उके,नंदुजी कोरे,ग्राम ठाणाचे सरपंच छायाताई देशकर,ग्राम गोरठाचे सरपंच धर्मराजजी पाथोडे,ग्राम शिवणीचे सरपंच संतोषजी सतीसशहारे,ग्राम चिरचाळबांधचे सरपंच ललिताताई भाजीपाले,ग्राम दहेगावचे सरपंच आत्मारामजी मडावी,बाल विकास विभागाचे सुरेखाताई ठलाल,पाणी पुरवठा विभागाचे गांधी पटले,गट शिक्षण अधिकारी राजेंद्र येटरे,उपअभियंता पी.एम.दमाहे,वर्षाताई भेलावे,हेमंतजी ठाकरे,गोपालजी हनवते,प्रभुदासजी बोरकर,बाबुरावजी कोरे, सुभाषजी चुटे,सुरेंद्रजी हरिणखेडे यांचे सह प्राथमिक आरोग्य केंद्र ठाणाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




