34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ भानपुर प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समिती सभा

भानपुर प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समिती सभा

0
86

blank

जनआरोग्य समितीने केले परिसरात एक पेड मॉ  के नाम” वृक्षारोपण

गोंदिया,दि.०१- तालुक्यातील भानपुर प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीची सभा जिल्हा परिषद सदस्य कटंगी पुजा अखिलेश सेठ व जिल्हा परिषद सदस्य फुलचुर योपेंद्रसिंग टेंभरे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली.सुरवातीला सभेचे प्रास्ताविक व मागील सभेचे ईतीवृत्त वाचन प्राथमिक आरोग्य केंद्र भानपुरचे प्रभारी वैद्यकिय अधिकारी डॉ.अमर खोब्रागडे यांनी केले.

या सभेमध्ये विविध आरोग्य विषयक कामकाज व समस्यांवर चर्चा करण्यात आलीतसेच आरोग्य संस्थेत पुढिल आर्थिक व भौतिक बाबीवर चर्चा करुन नियोजन करण्यात आल्याची माहीती वैद्यकिय अधिकारी डॉ.तुलसी भगत यांनी दिली आहे.जन आरोग्य समितीचे दोन्ही जिल्हा परिषद सदस्य पुजा अखिलेश सेठ व योपेंद्रसिंग टेंभरे यांनी आरोग्य संस्थेतील अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यक्षेत्रातील लोकांना गुणवत्तापुर्ण आरोग्य सेवा देण्याचे निर्देषित करुन आरोग्य संस्थेच्या समस्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोडविल्या जातीलअशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.

जन आरोग्य समितीनेनंतर एक पेड मॉ  के नाम” उपक्रम अंतर्गत दोन्ही अध्यक्ष  पुजा अखिलेश सेठ जि..सदस्य कटंगी व योपेंद्रसिंग टेंभरे साहेब जि.प.सदस्य फुलचुर यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.भानपुर आरोग्य संस्थेच्या परिसरात एक पेड मॉ  के नाम” वृक्षारोपण करुन पर्यावरणासाठी सर्वांनी योगदान करण्याचे आवाहन ह्याप्रसंगी केले.व नंतर प्रभारी वैद्यकिय अधिकारी डॉ.अमर खोब्रागडेवैद्यकिय अधिकारी डॉ.तुलशी भगतडॉ.दिक्षा बिसेन तसेच प्रा आ केंद्र भानपुर येथील सर्व सामुदायिक आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आशा सेविका यांचे उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी झाला.

सभेला व वृक्षारोपणाला यावेळी ग्राम चे भानपुर उपसरपंच योगेश पतेहशेजगाव ग्रामचे माजी सरपंच रामेश्वर चौरागडे व ईतर प्रतिष्ठित व्यक्ती सुद्धा उपस्थित होते.

blank