
गोंदिया, दि.14 : राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे गोंदिया जिल्ह्याचे दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दि.14 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता नागपूर येथून गोंदियाकडे प्रयाण. सायंकाळी 7.30 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आगमन व राखीव.
दि.15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 ते 10 पर्यंत पोलीस मुख्यालय मैदान कारंजा, गोंदिया येथे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित. सकाळी 10.10 ते 10.40 पर्यंत महर्षी अरविंद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, फुलचूर पेठ, गोरेगाव रोड, गोंदिया येथे विभाजन विभिषिका कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.40 ते 11.45 पर्यंत महर्षी अरविंद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, फुलचूर पेठ, गोरेगाव रोड, गोंदिया येथे संस्था व्यवस्थापन समिती (IMC) जिल्हा आढावा बैठक. पंडित दीनदयाल उपाध्याय हिरक महोत्सव जिल्हा समिती बैठक. जिल्हा आयटीआय विभाग आढावा बैठक. जिल्हा कौशल्य विकास विभाग आढावा बैठक. दुपारी 12 ते 12.30 पर्यंत शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे स्थानिक कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 12.30 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथून चारचाकी वाहनाने नागपूरकडे प्रयाण.





