गोंदिया-. गोठणगाव वनपरिक्षेत्रांतर्गत संजयनगर येथे बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. नागरिकांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर आपला रोष व्यक्त करीत हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली होती. त्याला जेरबंद करण्यासाठी गत ३ दिवसांपासून वनविभागाचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करीत होते. त्यांना रविवारी (दि. २८) दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास यश मिळाले असून अखेर वनविभागाचे पथक आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील संजयनगर बंगाली कॅम्प येथे पहाटे ५.३० वाजेदरम्यान घराच्या पडवीत लघुशंका करीत असलेल्या अंश प्रकाश मंडल (५) या चिमुकल्यावर बिबट्याने झडप घालून काही अंतरावर फरफटत नेत जीव घेतला. परिसरात बातमी पसरताच जनतेच्या
संतापाचा उद्रेक वाढला. त्यामुळे चक्काजाम आंदोलन करून तर वनकर्माचाऱ्यांच्या गाडीची तोडफोड करून नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला होता. मात्र ३ मुलांना गंभीर जखमी करून चौथ्या मुलाचा बळी घेणारा हा बिबट तोच आहे का? याबाबत ग्रामस्थांच्या मनात शंका आहे. त्यामुळे प्रशासनाने बिबट्याची लाळ तपासून खात्री करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली. वनविभागाच्यावतीने गत ३ दिवसांपासून शोधमोहीम जारी केली होती. वि घटनेच्या ठिकाणी व परिसरात पिंजरा ध लावला होता. अखेर रविवारी दुपारी अ भक्षाच्या शोधात पिंजरा लावलेल्या नि ठिकाणी बिबट आला. पिंजऱ्यातील ग कोंबडीचा फडशा पाडताच पिंजऱ्याचा त्व दरवाजा बंद होऊन तो जेरबंद झाला.
परिसरात लावलेले पिंजरे आणि कॅमेऱ्यात वेळोवेळी टिपलेल्या दृश्यानुसार खात्रीने तोच बिबट असल्याचे निदर्शनास येत आहे. तरीही याबाबत फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट बघितला जाईल. सर्वप्रथम हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्याची प्राथमिकता होती, आता याप्रकरणी ज्या-ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केला त्यांच्यावर चौकशीअंती निलंबनाची कारवाई करण्यात येईल.
– पवनकुमार जोंग, उपवनसंरक्षक,
वनविभाग गोंदिया





