25.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ बनगाव येथे “स्वस्थ नारी-सशक्त परिवार” अभियान अंतर्गत ४०० नागरिकांची तपासणी

बनगाव येथे “स्वस्थ नारी-सशक्त परिवार” अभियान अंतर्गत ४०० नागरिकांची तपासणी

0
42

आमगाव,दि.०२ः तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बनगाव येथे स्वस्थ नारी-सशक्त परिवार अभियान अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन सार्वजनिक आरोग्य विभागाने व एकात्मिक महिला व बाल कल्याण विकास विभागाने यांच्या संयुक्त विद्यमान द्वारे करण्यात आले.सदर शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती सुरेश हर्षे,जि.प.सदस्य तथा बनगाव प्रा.आ.केंन्द्राचे जन आरोग्य समिती अध्यक्ष किशोरभाऊ महारवाडे,सभापती पंचायत समिती आमगाव योगिताताई पुंडेजि.प.सदस्या छबुताई उके,उपसभापती पंचायत समिती आमगाव सुनंदाताई उके,सदस्य पंचायत समिती आमगाव तारेंद्रजी रामटेके व तिलकचंदजी मडावी यांचे उपस्थितीत संपन्न झाले.

सर्वात प्रथम मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.आरोग्य शिबीराप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे,आमगाव तालुका आरोग्य अधिकारी डाँ.रोशन राऊत,क्षयरोग विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे व डॉ.देव चांदेवार यांचेसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयके.टी.एस सामान्य रुग्णालय येथील बांलरोग तज्ञ डॉ.राहुल चौरागडे,स्त्री रोग तज्ञ डॉ.गरिमा बग्गा,कान-नाक-घसा तज्ञ डॉ.ईशान तुरकर,दंतरोग तज्ञ डॉ.मोहमद दुबेर,नेत्ररोग तज्ञ डॉ.प्रतिक्षा धुले यांनी लोकांना आरोग्य सेवा दिली.

आरोग्य शिबीरात 400 लोकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला त्यात प्रामुख्याने 72 गरोदर माता,7 स्तनदा माता,30 बालकांची तपासणी करण्यात आली.त्याच सोबत लोकांनी आयुष सेवा,नेत्र तपासणी,दंतरोग तपासणी,आवश्यक प्रयोगशाळा तपासणी केल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ.भुमेश्वर पटले यांनी दिली आहे.

शिबीराप्रसंगी गरोदर माता,स्तनदा माता तपासणी,कुपोषित सँम व मॅम बालकं तपासणीघसा नाक-कान-घसा व नेत्र तपासणी ,दंत तपासणी,आयुष पंचकर्म,किशोरवयीन मुली याचे लसिकरण,ईसीजी, सिकलसेल, मधुमेह, रक्तदाब,कुष्ठरोग, क्षयरोग, हिवताप यांच्या सुद्धा तपासणी करण्यात आल्यात.विविध आजाराबाबत जनजागृती प्रदर्शन,जलजण्य आजाराबद्दल समुपदेशनगप्पी मासेलार्वा प्रदर्शनीमानव विकास कार्यक्रमतसेच सर्वांचे आकर्षण म्हणजे योगा प्रात्यक्षिक व पोषण आहार प्रदर्शन यावर सेवा देण्यात आल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डाँ.वेदिका भोयर यांनी दिली आहे.

आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाँ.वेदिका भोयरडॉ.भुमेश्वर पटले,डाँ.ताम्रध्वज नागपुरे यांचे मार्गदर्शन लाभले.शिबीराप्रसंगी कार्यक्षेत्रातील सामुदायिक आरोग्य अधिकारी,आरोग्य सहाय्यक,आरोग्य सहायिकाप्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,फ्लेबेटोमिस्ट,आशा गट प्रवर्तक,आरोग्य सेविका,आरोग्य सेवक,आशा सेविका,अंगणवाडी सेविका,परिचर,स्वच्छकड्रायव्हरडाटा आपरेटर,मदतनीस या सर्वांचे सहकार्य लाभले.