गोरेगाव,दि.०७ः तालुक्यातील परशुराम हायस्कुल मोहगाव(बु.)येथील सेवानिवृत्त शिक्षक डी.डी.चौरागडे(विद्यमान रहिवासी तिरोडा)यांचे आज ७ आँक्टोंबरला सायकांळला ४ वाजेच्या सुमारास गोरेगाव -तिरोडा मार्गावरील मंगेझरी जंगलपरिसरात अपघाती निधन झाले.पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली असून चौरागडे यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीकरीता आणण्यात आले आहे.त्यांच्या मागे बराच आप्त परिवार असून उद्या ८ आँक्टोंबरला तिरोडा येथील मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.





