गोंदिया-तिरोडा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय,तालुका नियंत्रण पथक व ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट तिरोडा तसेच गोंदिया तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र एकोडी व आरोग्य उपकेंद्र गंगाझरी येथे भेट देवुन आरोग्य सेवा व स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाची पाहणी आरोग्य विभागाच्या सहसंचालक डाॅ.सरिता हजारे यांनी केली.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आरोग्य विभागाचे सहसंचालक(प्रा.आ.केंदे/उपकेंद्
दुसर्या दुपार सत्र भेटीत गोंदिया तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र एकोडी व आरोग्य उपकेंद्र गंगाझरी येथे भेट देवुन स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आढावा सोबतच आरोग्य संस्थेमार्फत राबविण्यात येणार्या आरोग्य कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला.त्या सोबतच संस्थेची आतील बाहेरील परीसर स्वच्छता,प्रसुतीकक्ष,वॉर्ड,औषधी
तिरोडा येथील भेटीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तृप्ती कटरे,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय डॉ.राहुल शेंडे, तिरोडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दर्शना नंदागवळी,वैद्यकीय अधिकारी,डॉ.संजय भगत, डॉ.येरणे,डॉ.गुरुप्रकाश खोब्रागडे यांचेसह तालुका नियंत्रक पथक व उपजिल्हा रुग्णायलातील सर्व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.गोंदिया येथील भेटीत जिल्हास्तरीय अधिकारी यांचे सह गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेश जाधव,एकोडी प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बिसेन व डॉ. पल्लवी भगत, गंगाझरी सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ.मंगेश कामडी यांचेसह प्राथमिक आरोग्य केंद्र एकोडी व आरोग्य उपकेंद्र गंगाझरी येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते.





