मांगली ग्रामसेवक जाधव मारहाणप्रकरणी मोर्चा

0
10

भंडारा,दि.8 :पवनी तालुक्यातील मांगली येथील ग्रामसेवक दत्ता जाधव यांना झालेल्या मारहाण प्रकरणी आरोपींना कठोर कारवाई करण्यास्तव बुधवारला जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय कृती समिती व ग्रामसेवक युनियने जिल्हा परिषदवर संयुक्त धडक मोर्चा काढून अधिकार्‍यांना घेराव घातला.
ग्रामसेवक दत्ता जाधव यांना ग्रामपंचायत मांगली ता.पवनी येथील ग्रामसभा सुरु असताना मारहाण करून शासकीय दस्तावेज फाडले. या प्रकरणी पवनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. आरोपीवर कारवाई करण्यात न आल्यामुळे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामसभेला उपस्थित पोलीस कर्मचार्‍यावर कारवाई करावी, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे कामकाजावर कामबंदी करण्यात यावे, आदी मागण्यासंदर्भात जिल्हाभर कामबंद आंदोलन करण्यात आले. त्यासंबंधी योग्य ती कार्यवाही व्हावी, याकरिता जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. त्यानंतर जिल्हा परीषदेच्या आवारात आयोजित सभेत कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर कळंबे, कार्याध्यक्ष सतीश मारबते, सरचिटणीस टी.आर. बोरकर, मुख्य संघटक अतुल वर्मा, मार्गदर्शक गोपाल कारेमोरे, ग्रामसेवक संघटनेचे संयुक्त सचिव अनिल कोहळे, जिल्हाध्यक्ष शिवपाल भाजीपाले, सरचिटणीस श्याम बिलवणे, विभागीय सचिव विलास खोब्रागडे, कोषाध्यक्ष जयेश वेदी, उपाध्यक्ष विवेक भरणे, तालुका अध्यक्ष प्रदीप लांजेवार, सचिव दत्ता जाधव, जयंत गडपायले, पवनीचे सोनुले, किशोर लेंडे, अजय राऊत, एन.सी. बिसेन, लाखांदूरचे नरेंद्र गजभिये, मनोज वरुडकर, तुळशीदास कोरे, अनिल धमगाये, दिगांबर गभणे, नरेंद्र सौदागर, फुलचंद बडवाईक, पंकज काटेखाये, नरेश शिवनकर, शामराव नागदेवे, विनोद भांडारकर, विलास मुंडे व ग्रामसेवक हजर होते.