24.4 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ ६९व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध उद्दोजक पांडुरंग खांदवे

६९व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध उद्दोजक पांडुरंग खांदवे

0
42

यवतमाळ दि.27- विदर्भ साहित्य संघ शाखा जांब -यवतमाळ व ईश्वर फाउंडेशन दिग्रस यांच्या संयुक्त विधमाणे विद्यमाने १ आणि २ नोहेंबर रोजी होणाऱ्या ६९ वे विदर्भ साहित्य संमेलन होत आहे.या संमेलनाच्या स्वागताध्यक्षाची जबाबदारी येथील प्रसिद्ध उद्दोजक पांडुरंग खांदवे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी माजी मंत्री शिवाजीराव मोघे,माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर,माजी आमदार मदन येरावार,माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी उचलली होती.यशस्वी उद्दोजक व शिक्षण क्षेत्रात अनुभवी व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या पांडुरंग खांदवे यांच्या नेतृत्वात ६९ विदर्भ साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पडेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडी बद्दल जांब च्या सरपंच तथा विदर्भ साहित्य संघ जांबच्या शाखाध्यक्ष सोनाली टीचुकले ,मुख्य आयोजक हेमंत कांबळे व इतर पदाधिकाऱ्यांनी पांडुरंग खांदवे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे स्वागत केले .

blank