सालेकसा,दि.२७ः गोंदिया जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक बांधकाम, उद्योग, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन,मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना सालेकसा तालुक्यातील विविध मागण्या व समस्यांचे निवेदन तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वात देण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सालेकसा तालुक्याचे वतीने सालेकसा आमगाव दरेकसा राज्यमार्ग ३३५ मध्ये जागोजागी पडलेले खड्डे आणि दुरूस्ती कार्य निधी अभावी थांबल्याने तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.तसेच अतिरिक्त वार्षिक देखभाल दुरुस्ती साठी निधी मंजूर करण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ.अजय उमाटे,डॉ.हिरालाल साठवणे,ब्रजभूषण बैस,बाजीराव तरोने,महिला तालुका अध्यक्ष गीताताई चौधरी,रघुदास नागपुरे,किसन रहांगडाले,रत्नमाला किरसान,ललित किरसान,सुरेश कुंभरे,संजय वडगाये ,हिरालाल घरत,रिषी बैस उपस्थित होते.





