चित्रा कापसे
तिरोडा,दि.२८-राज्याचे सार्वजनिक बांधकाम,आदिवासी विकास विभागाचे राज्यमंंत्री व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनिल नाईक हे गोंदियात(दि.२७) आले असता तिरोडा नगरपरिषद क्षेत्रातील विकासाच्या मुद्यावर तसेच इतर मागण्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हेमंत( मन्नू ) लिल्हारे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत त्यांचे स्वागत करीत चर्चा केली.पालकमंत्री नाईक यांना तिरोडा शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील अनेक समस्या अवगत करुन देत शहर सुंदर व स्वच्छ करण्याकरीता निधीची उपलब्धता करुन देण्याची विनंती केली.यावर पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन याविषयी येत्या काळात नियोजन करण्याविषयी आश्वस्त केले.सत्कार करते वेळी हेमंत लिल्हारे यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार राहांगडाले, फटिंग व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.





