27.3 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ तुमसरच्या शिवनगरातील बीएसएनएल कॉलनीत भीषण आग

तुमसरच्या शिवनगरातील बीएसएनएल कॉलनीत भीषण आग

0
80

तुमसर,दि.१७ः शहरातील शिवनगर येथील बीएसएनएल कॉलनीत आज शनिवारला(दि. १७ जानेवारी) सायंकाळला ७ वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आग नेमकी कशामुळे व कुणी लावली याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.आग लागल्यानंतर काही वेळातच परिसरात धुराचे मोठे लोट पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीची तीव्रता अधिक असल्याने स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन यंत्रणेला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, या आगीत झालेल्या नुकसानीचा नेमका अंदाज अद्याप घेण्यात आलेला नसून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

blank